लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2024 09:11 AM2024-07-07T09:11:44+5:302024-07-07T09:12:50+5:30

यंदा आषाढी एकादशी १७ जुलै बुधवारी असणार आहे.

idol of God Vitthal in Bigg Boss Marathi Season 4 Winner Akshay Kelkar Hosue Photo Viral | लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक

यंदा आषाढी एकादशी १७ जुलै बुधवारी असणार आहे.  अनेक विठ्ठल भक्त आणि वारकरी संप्रदाय पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या दिंडीसोबत नाचत-गात, टाळ-मृदुंगासमवेत विठ्ठलाचे नामस्मरण करत आहे. सध्या संपुर्ण महाराष्ट्राला सावळ्या विठुरायाचे वेड लागले आहे. नुकतंच एका लोकप्रिय अभिनेत्यानं त्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाच्या मूर्तीची झलक ही पोस्ट शेअर करत चाहत्यांना दाखवली आहे. ही मुर्ती सगळ्यांचं लक्ष आकर्षून घेते आहे.

अक्षय केळकर यानं मुंबईतील त्याच्या घरात विठ्ठलाची मूर्ती ठेवली आहे. या विठ्ठलाच्या मूर्तीचा एक फोटो शेअर करत अक्षयनं त्याच्या भावानाही व्यक्त केल्या आहेत. त्यानं शेअर केलेल्या फोटोमध्ये खिडकीचवरच्या काचेत विठ्ठलाचं प्रतिबिंब दिसून येत आहे.  फोटो शेअर करत अक्षयनं लिहलं, 'ही माझ्या घरची खिडकी... इथून उन दिसत, वारा दिसतो, पाऊस दिसतो... इथून आकाश दिसत... आकाशात असंख्य स्वप्न ही दिसतात... आणि पाठीशी तू आहेस की || राम कृष्ण हरी ||". सध्या अक्षयच्या घरातल्या विठ्ठलाच्या मूर्तीची चर्चा होताना दिसतेय. 

अक्षय केळकरच्या घरात विठ्ठलाच्या मुर्तीसह महाराजांचा पुतळा देखील लक्ष वेधून घेतो.  अक्षयच्या घरात लाकडी फर्निचरचा जास्त वापर करण्यात आलेला आहे. इतकंच नाही तर काही युनिक आणि अँटिक गोष्टींनी त्याने त्याचं घर सजवलं आहे. यासोबतच  बिग बॉसच्या घरात त्याला मिळालेली नेमप्लेट त्याने त्याच्या दरवाजाबाहेर लावली आहे. 

अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो मराठीसह हिंदी कलाविश्वात सक्रीय आहे. सध्या तो 'अबीर गुलाल' या मालिकेत अगस्त्य ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी त्याने ढोलकीच्या तालावर, दोन कटींग ३, नील मृगसी, माधुरी: वय विचारु नका, बाकरवडी, अशा कितीतरी मालिका, रिअॅलिटी शो, सिनेमा आणि वेब फिल्ममध्ये तो झळकला आहे.

Web Title: idol of God Vitthal in Bigg Boss Marathi Season 4 Winner Akshay Kelkar Hosue Photo Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.