या अभिनेत्रीला बॉलिवूड नाही तर टीव्ही नायिका बनण्यातच आहे रस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2018 11:37 AM2018-03-08T11:37:06+5:302018-03-08T17:07:35+5:30
ऐश्वर्या,प्रियंका आणि दीपिका अशा सौंदर्यंवती बी-टाऊनमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत आहे.अनेक कलाकारांना या सौंदर्यवतीप्रमाणे बॉलिवूडमध्ये एंट्री करत एक ...
ऐ ्वर्या,प्रियंका आणि दीपिका अशा सौंदर्यंवती बी-टाऊनमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांचे मनोरंजन करत आहे.अनेक कलाकारांना या सौंदर्यवतीप्रमाणे बॉलिवूडमध्ये एंट्री करत एक वेगेळे स्थान मिळवण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मात्र बॉलिवूडमध्येच का इतर माध्यमामध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावरही आपण आपले स्थान निर्माण करू शकतो असे वेगळे मत मांडले आहे सुरभी चंदनाने या अभिनेत्रीने. सुरभीला बॉलिवूडपेक्षा टीव्ही मालिकांमध्येच काम करायला जास्त आवडते.सुरभीने ‘इश्कबाझ’ मालिकेत अन्निकाची भूमिका साकारली होती.सुरभि चंदनाने म्हटले आहे की बॉलिवूडने तिला कधीच भुरळ पाडली नाही.उलट तिला टीव्हीवर नायिका व्हायचे स्वप्न होते.आणि तेच स्वप्न तिने प्रत्यक्षात उतरवलेही.सुरभिने टीव्हीवरील मालिकांमध्ये पदार्पण करण्यापूर्वी विद्या बालनच्या ‘बॉबी जासूस’ चित्रपटात एक छोटीशी पण महत्त्वाची भूमिका साकारली होती.फार कमी लोकांना ही गोष्ट माहित असावी.यासंदर्भात सुरभिने सांगितले, “मी बॉलिवूडची कधीच चाहती नव्हते.येत्या शुक्रवारी कोणता चित्रपट प्रदर्शित होत आहे,त्याची बरेचदा मला काहीही कल्पना नसायची. कारण मी हिंदी चित्रपटांमध्ये तितकी गुंतलेलीच नव्हते.हिंदी चित्रपटात भूमिका रंगविणं हे दैनंदिन टीव्ही मालिकांत भूमिका रंगविण्यापेक्षा कमी कष्टदायक आहे,असं अनेकजण सांगतात.पण टीव्ही जितक्या रसिकांपर्यंत पोहोचू शकतो, तितकं कोणतंही माध्यम प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाही, हे वास्तव आहे.”
सध्या इश्काबाज मालिकेमुळे तिला अनेक आव्हानात्मक काम करायला मिळत असल्यामुळे ती खूप खुश आहे.मालिकेत ती दुहेरी भूमिका साकारत आहे.आपल्या या आगामी दुहेरी भूमिकेबद्दल सुरभि म्हणाली, “अन्निकाची प्रारंभीची भूमिका मला फार आवडायची, कारण त्यात ती सुंदर दिसत असली, तरी तिचा लहरी स्वभाव व्यक्त होत होता. आता ती अधिक प्रौढ झाली असून तिच्या लग्नानंतर ती अधिक परिपक्व दिसत होती. आता ही तिची हमशकल मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच विरोधी असेल. ही नवी अन्निका बरीचशी ‘जोश’ चित्रपटातील ऐश्वर्या रायच्या व्यक्तिरेखेप्रमाणे असेल; मात्र तिच्या स्वभावात विनोदाचा भाग अधिक असेल.”दुहेरी भूमिकेत सुरभि अन्निकाचीच भूमिका साकारणार असून तिच्यासारखी दिसणारी दुसरी अन्निका ही मात्र तिच्या स्वभावापेक्षा अगदीच भिन्न असल्याचे तिने सांगितले आहे.