ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 09:15 IST2025-03-25T09:14:47+5:302025-03-25T09:15:26+5:30

Karan Kundra-Tejaswi Prakash : अभिनेता करण कुंद्रा आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत.

If it's decided then! Karan Kundra-Tejaswi Prakash's wedding was stopped?, photos went viral | ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो

ठरलं तर मग! करण कुंद्रा-तेजस्वी प्रकाशचा झाला रोका?, व्हायरल झाले फोटो

अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि अभिनेत्री तेजस्वी प्रकाश (Tejaswi Prakash) हे टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोघेही त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. अलिकडेच, तेजस्वी प्रकाशच्या आईने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ' या कुकिंग रिॲलिटी शोमध्ये खुलासा केला की, त्यांच्या मुलीचे लग्न याच वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये होणार आहे. दरम्यान, तेजस्वी आणि करणचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांचा हात धरून पूजा करताना दिसत आहेत.

तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्राचे हे फोटो पाहून दोघांचा रोका झाला असल्याचा तर्क चाहते लावत आहेत. आता दोघे लवकरच लग्न करणार आहेत. फोटोंमध्ये करण आणि तेजस्वी घरी पूजा करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते. करण आणि तेजस्वी पारंपरिक लूकमध्ये दिसत आहेत.


काय आहे व्हायरल फोटोंचं सत्य?
तेजस्वी प्रकाशच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर हे फोटो शेअर करण्यात आले आहेत. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'नात्याला अधिकृत करण्याची वेळ आली आहे का?' मात्र ही फोटो या जोडप्याच्या रोका सोहळ्यातील नसून दिवाळीच्या सेलिब्रेशनची आहेत. गेल्या वर्षी दोघांनी एकत्र दिवाळीची पूजा केली होती. मात्र, या जोडप्याचे फोटो व्हायरल होत असल्याचे पाहून चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये दोघांचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली आहे.

'बिग बॉस १५'पासून सुरू झाली प्रेमकहाणी
रिॲलिटी शो 'बिग बॉस १५'मध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांच्यात जवळीक वाढत गेली होती. यानंतर दोघेही नेहमीच एकत्र स्पॉट होऊ लागले. मात्र, या जोडप्याने त्यांचे नाते कधीच कोणापासून लपवले नाही. अलिकडेच, तेजस्वीच्या आईने 'सेलिब्रिटी मास्टरशेफ'च्या एका एपिसोडमध्ये पुष्टी केली की तिची मुलगी या वर्षी लग्न करणार आहे. जेव्हा फराह खानने तेजस्वीच्या आईला विचारले की, 'दोघांचे लग्न कधी होणार?', तेव्हा तिने लगेच उत्तर दिले, 'या वर्षी लग्न होणार आहे.'

Web Title: If it's decided then! Karan Kundra-Tejaswi Prakash's wedding was stopped?, photos went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.