राजकीय पोस्ट टाकल्यामुळे किरण माने यांना काढलं असेल तर ते निषेधार्ह, योगेश सोमण यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 10:04 PM2022-01-15T22:04:27+5:302022-01-15T22:06:42+5:30

Yogesh Soman News: Kiran Mane प्रकरणावर भाष्य करताना  योगेश सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते निषेधार्ह आहे, असे मतही त्यांनी मांडलं.

If Kiran Mane has been removed for posting a political post, it is a reaction of Yogesh Soman | राजकीय पोस्ट टाकल्यामुळे किरण माने यांना काढलं असेल तर ते निषेधार्ह, योगेश सोमण यांची प्रतिक्रिया

राजकीय पोस्ट टाकल्यामुळे किरण माने यांना काढलं असेल तर ते निषेधार्ह, योगेश सोमण यांची प्रतिक्रिया

googlenewsNext

जळगाव - एखादी चांगली गोष्ट म्हणून जशी पाठीवर शाबासकीची थाप पडते किंवा त्याला खूप चांगल्या पद्धतीनं स्वीकारलं जातं, तसे कधी कधी आक्षेपही घेतले जातात. इट्स अ पार्ट ऑफ गेम, असं मत ज्येष्ठ सिने दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण यांनी आज जळगावात सिने व नाट्य क्षेत्रातील घडामोडींवर भाष्य करताना व्यक्त केलं. तसेच किरण माने प्रकरणावर भाष्य करताना सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते निषेधार्ह आहे, असे मतही त्यांनी मांडलं.

जळगावातील अण्णासाहेब डॉ. जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय आणि अजिंठा फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवलच्या उदघाटन सोहळ्यानंतर प्रा. सोमण यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल जळगावसारख्या ठिकाणी आयोजित होणं ही चांगली बाब आहे. तरुण प्रेक्षक आणि शॉर्ट फिल्म बनवणाऱ्या नवोदितांसाठी हे उत्तम व्यासपीठ आहे, असेही त्यांनी सांगितले.

मोबाईल संस्कृतीचा विधायक वापर व्हायला हवा
आज प्रत्येकाच्या हातात अँड्रॉइड मोबाईल आहे. या मोबाईल संस्कृतीचा विधायक वापर व्हायला हवा. मोबाईलच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर शॉर्ट फिल्म तयार होऊ शकतात. त्या समाजमाध्यमांमध्ये प्रसारित करून तुम्हाला तुमच्या भूमिकेसाठी प्रेक्षकवर्ग तयार करता येऊ शकतो, असेही ते म्हणाले.

एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा
अभिनेता किरण मानेंना त्यांनी मांडलेल्या मतावरून स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेतून काढून टाकण्यात आले आहे. याबाबत पत्रकारांनी छेडले असता प्रा. सोमण यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट बोलणं टाळलं. मात्र, एखाद्याच्या व्यक्तिगत मतांचा त्याच्या व्यवसायाशी संबंध नसावा, असे त्यांनी सांगितले. जर त्यांना राजकीय पोस्ट टाकल्यामुळे काढलं असेल तर ते निषेधार्ह आहे, असे मतही त्यांनी मांडलं.

अभिव्यक्त होणं थांबत नाही
प्रा. सोमण पुढं म्हणाले की, अभिव्यक्त होणे थांबत नाही. मी देखील काही वेळा व्यक्त झाल्यानंतर माझ्यावर पण खूप मोठं आक्रमण झालं होतं. निषेध केला गेला होता. आक्षेप घेतला गेला तरीही मी माझ्या भूमिकेवर ठाम होतो. शेवटी मी असं म्हणेल की जसं कलाकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसं प्रेक्षकांना प्रतिक्रिया स्वातंत्र्य आहे, ते आपण का नाकारायचे. ही लढाई अशीच चालू राहील, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

Web Title: If Kiran Mane has been removed for posting a political post, it is a reaction of Yogesh Soman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.