"तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या,अन्यथा भुंकणे थांबवा", माही विज ट्रोलर्सवर भडकली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 02:37 PM2020-08-29T14:37:32+5:302020-08-29T14:44:20+5:30
माहीला सोशल मीडियावर पहिल्यांदाच ट्रोल केले असे नाही. याआधीही बर्याचदा नेटीझन्सने तिला ट्रोल केले होते. काही माथेफिरू नेटीझन्सने तर तिला थेट बलात्काराची धमकी दिली होती.
टीव्ही अभिनेत्री माही विज सोशल मीडियावर खूप अॅक्टिव असते. तिच्याशी निगडीत सगळ्या गोष्टी ती चाहत्यांसह शेअर करते. मात्र कधी कधी हाच मनमोकळेपणा सेलिब्रेटींसाठी डोकेदुखी ठरते.सेलेब्रिटींना बर्याचदा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते . सध्या नेटीझन्स माहीला जबरदस्त ट्रोल केल जात आहे. त्याला कारण म्हणजे माहीने दत्तक मुलं खुशी आणि राजवीरला काही महिन्यांकरिता त्यांच्या गावी पाठवले आहे. मुलांसोबतच एक फोटो माहीने शेअर केला आणि हाच मुद्दा पकडून तिला वेगवेगळे प्रश्न विचारून हैराण केले आहे.
नेटीझन्सने माहीला टार्गेट करत म्हटले आहे की, 'आता काय फरक पडतो, तारा आल्यापासून, आपण फक्त तिच्यावरच प्रेम केले. राजवीर आणि खुशी आता तुमच्यासाठी ओझे झाले आहेत. असे नसते तर तुम्ही त्यांना इतक्या महिन्यांसाठी का पाठवले असते? स्क्रीनशॉट शेअर करत 'मॅडम, तुमची विचारसरणी खूप खराब असल्याचे सांगत तिच्यावर टीकाही करत आहेत. नेटीझन्स इथवरच थांबले नाहीत त्यांनी स्वतःच्या मुलीला आता वेळ देता यावा म्हणून दत्तक घेतलेल्या मुलांना तुम्ही जाणूनबुजून दुर्लक्षित करत असल्याचे बोलत आहेत. यावर माहीनेही गप्प न राहता सडतोड उत्तर देत नेटीझन्सवर संताप व्यक्त केला आहे.
माही विज आणि जय भानुशालीच्या लग्नाला सात वर्ष झाली होती. दोघेही बाळासाठी प्रयत्न करत होते. मात्र काही कारणामुळे त्यांना बाळ होत नव्हते. म्हणून माही आणि जयने खुशी आणि राजवीर या मुलांना दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. त्यांचा स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळ ते दोघे करत आहेत. दोघेही प्रत्येक क्षण आनंदाने त्यांच्याबरोबर साजरे करताना पाहायला मिळतात.
माहीला सोशल मीडियावर पहिल्यांदाच ट्रोल केले असे नाही. याआधीही बर्याचदा नेटीझन्सने तिला ट्रोल केले होते. काही माथेफिरू नेटीझन्सने तर तिला थेट बलात्काराची धमकी दिली होती. यावर गप्प न राहाता माहीने पोलिस स्टेशनमध्ये यासंदर्भात तक्रारही दिली होती. माहीने ट्वीट करून लिहिले होते की, तुमच्यात हिंमत असेल तर समोरासमोर या, अन्यथा भुंकणे थांबवा. तुमच्यासारख्या वाईट व्यक्तीला जन्म दिल्याबद्दल तुमच्या कुटुंबालाही लाज वाटत असावी असे सांगत नेटीझन्सना खडसावले होते.