VIDEO : शूटींगदरम्यान मयुरी देशमुखच्या साडीला लागली आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2021 16:28 IST2021-10-29T16:26:11+5:302021-10-29T16:28:39+5:30
टीव्ही मालिका 'इमली' (Imlie) मध्ये निगेटिव्ह भूमिका करणारी मालिनी म्हणजे अभिनेत्री मयुरी देशमुख( Mayuri Deshmukh) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO : शूटींगदरम्यान मयुरी देशमुखच्या साडीला लागली आग, थोडक्यात टळली मोठी दुर्घटना
कोणत्याही कलाकाराचं काम असतं की, आपला शॉट कोणत्याही स्थितीत चांगला करणे. मग त्यांना कितीही त्रासाचा सामना करावा लागेल. हिंदी टीव्ही मालिका 'इमली' (TV Serial Imlie) च्या अभिनेत्रीने असंच केलं. आपला जीव धोक्यात घालून तिने शॉट पूर्ण केला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत.
टीव्ही मालिका 'इमली' (Imlie) मध्ये निगेटिव्ह भूमिका करणारी मालिनी म्हणजे अभिनेत्री मयुरी देशमुख( Mayuri Deshmukh) चा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत ती एक शॉट देताना दिसत आहे. अभिनेत्रीच्या हातात एक मोठा फोटो दिसत आहे. ज्याला आग लावली जात आहे. मयुरी जरा घाबरलेली दिसत आहे. कारण आग मयुरीच्या साडीच्या पदरापर्यंत पोहोचते. तिचं लक्ष वेळीच आगीकडे आणि साडीकडे जातं, तेव्हा ती स्वत:ला वाचवते.
मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) वेळीच तप्तरता दाखवत आपला जीव वाचवला अन्यथा मोठी दुर्घटना झाली होऊ शकली असती. 'इमली' मालिका टीआरपी लिस्टमधील आपल्या स्पर्धक मालिकांना जोरदार टक्कर देत आहे. काही महिन्यांपूर्वीच सुरू झालेली ही मालिका लोकांच्या घरात मन करून आहे. मालिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तशी तर ही इमली नावाच्या एका मुलीची कथा आहे जिची भूमिका सुम्बुल तौकीर साकारत आहे. पण मराठी अभिनेत्री मयुरी देशमुखही यात मुख्य भूमिकेत आहे.