'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 02:20 PM2024-05-02T14:20:59+5:302024-05-02T14:21:19+5:30

Sare Kahi Tichyasathi : 'सारं काही तिच्यासाठी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत नुकतेच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशीला घेऊन मुंबईला जाणार आहे.

In an exciting twist to 'Sare Kahi tichyasathi', Srinu confesses his love to everyone! | 'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली!

'सारं काही तिच्यासाठी' उत्कंठावर्धक वळणावर, श्रीनूने सर्वांसमोर दिली आपल्या प्रेमाची कबुली!

'सारं काही तिच्यासाठी' मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. मालिकेत नुकतेच निशी-नीरजच्या लग्नाचा समारंभ पार पडला आणि थोड्याच दिवसात सचदेव कुटुंब निशीला घेऊन मुंबईला जाणार आहे. त्याआधी छाया, निशी, ओवी आणि बाकीच्या मैत्रिणी निशीसोबत छोटंसं गेट टुगेदर ठरवतात. पार्टीतून निशी आणि ओवी परत येत असताना काही गुंड येऊन पैसे आणि दागिने चोरण्याचा उद्देशाने निशीवर हल्ला करतात. 

निशी गळ्यातील मंगळसुत्र तिच्या गळ्यातून खेचून घेण्याचा प्रयत्न करतात तिकडे ओवी त्यांना प्रतिकार करते आणि त्या झटापटीत ओवी गंभीररीत्या जखमी होते.  निशी घाबरून दादा खोतांना फोन करते. ओवीची परिस्थिती गंभीर आहे. घरातले सगळेच काळजीत आहेत.  दादांना निशी सगळे सविस्तर सांगते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हल्ला झाल्यांनतर ओवीवर लगेच उपचार झाले असते. तर काहीतरी आशा होती पण तिला हॉस्पिटलला आणेपर्यंत खूप रक्त गेले आहे. जखम खोलवर आहे. त्यामुळे ओवीला वाचवण्याचे चान्सेस खूप कमी आहेत.

हे ऐकून श्रीनू ओवीच्या रूममध्ये जातो तिच्या जवळ बसून तिचा हात हातात घेऊन रडायला लागतो. रघुनाथ उमा, दाईची आणि लाली तिथे येतात तेव्हा श्रीनु सगळ्यांना त्याचे ओवीवर असलेल्या प्रेमाची कबुली देतो. श्रीनुच्या प्रेमाला घरातल्यांची साथ मिळेल का? हे सर्व जाणून घेण्यासाठी 'सारं काही तिच्यासाठी' मालिका पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: In an exciting twist to 'Sare Kahi tichyasathi', Srinu confesses his love to everyone!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.