'बॅकलेस टॉप'मध्ये उर्फी जावेदनं केला 'कच्चा बादाम' गाण्यावर डान्स; फॅन्सनं उडवली खिल्ली, पाहा Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 15:44 IST2022-02-01T15:42:34+5:302022-02-01T15:44:22+5:30
'बिग बॉस ओटीटी'तून बाहेर पडल्यानंतर इंटरनेट सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टाइक आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे उर्फी जावेद हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे.

'बॅकलेस टॉप'मध्ये उर्फी जावेदनं केला 'कच्चा बादाम' गाण्यावर डान्स; फॅन्सनं उडवली खिल्ली, पाहा Video
'बिग बॉस ओटीटी'तून बाहेर पडल्यानंतर इंटरनेट सेन्सेशन बनलेली उर्फी जावेद तिच्या हटके स्टाइक आणि ड्रेसिंगमुळे चर्चेत असते. बिग बॉसमुळे उर्फी जावेद हिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. उर्फी जावेद तिच्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरही ती पोस्ट करत असलेल्या व्हिडिओंमुळे नेहमी चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियात लोकप्रिय होण्यासाठीची एकही संधी उर्फी जावेद सोडत नाही. ती इन्स्टाग्रामवर पोस्ट करत असलेला प्रत्येक रील व्हिडिो तुफान व्हायरल होत असतो. नुकतंच तिनं सोशल मीडियात लोकप्रिय झालेल्या कच्चा बादाम गाण्यावर डान्स करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओत तिनं तिच्या ग्लॅमरस अदांसोबत तिनं परिधान केलेल्या बॅकलेस टॉपनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
उर्फीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर 'कच्चा बादाम' या व्हायरल गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात उर्फी ब्लू जीन्स आणि बॅकलेस टॉप परिधान केलेली दिसत आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये उर्फीनं 'कच्चा बादाम, बादाम, बादाम' असं लिहिलं आहे.
उर्फीनं परिधान केलेला बॅकलेस टॉप अनेकांच्या पसंतीस देखील उतरला आहे. तर काहींनी तिची खिल्ली देखील उडवली आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये युझर्सच्या हटके आणि मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. एका युझरनं तर उर्फीनं परिधान केलेला बॅकलेस टॉप समोरच्या बाजूनं काय फेव्हीक्वीकनं चिटकवला आहे का? असा सवाल करत खिल्ली उडवली आहे. तर काहींनी उर्फीच्या हॉट अंदाजाचं कौतुक देखील केलं आहे.