'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये साधीभोळी मिथिला सिम्मीला आणणार वठणीवर, करणार तिचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 11:25 IST2022-06-03T11:23:19+5:302022-06-03T11:25:54+5:30
'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे.

'माझी तुझी रेशीमगाठ'मध्ये साधीभोळी मिथिला सिम्मीला आणणार वठणीवर, करणार तिचा पर्दाफाश
'माझी तुझी रेशीमगाठ' (mazi tuzi reshimgath) ही मालिका सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणून चर्चेत आहे. सध्या या मालिकेत अनेक ट्विस्ट आणि टर्न्स येत असतानाच आता मालिकेत एक मोठं रंजक वळण आलं आहे. चौधरी कुटुंबात नेहा आणि परीचा समावेश झाल्यानंतर पॅलेसचं रुप अगदी पालटून गेलं होतं. पहिल्यांदाच त्यांचं कुटुंब एकत्र कुटुंबाप्रमाणे राहू लागलं होतं. मात्र सिम्मीला हे काही बघवत नाहीय. ती काहींना काही षडयंत्र रचत असते.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात नेहमी गप्प बसून सिम्मीचं सगळं ऐकून घेणारी मिथिला पहिल्यांदाच तिच्या विरोधात बोलताना दिसणार आहे. मिथिला आजपर्यंत सिम्मीची सगळी कारस्थान माहिती असूनही कायम शांत राहिली. पण आता मात्र ती गप्प बसताना दिसणार नाहीय.
प्रोमोमध्ये मिथिला सिम्मिचं बोलणं ऐकते. आणि मिथिला सिम्मीला ती चुकतं असल्याचं सांगते. नेहा तिचं काय बिघडवलंय असं विचारते. यावर सिम्मी तिला धमकावण्याचा प्रयत्न. कुठे काही बोलीस तर याद राखा अशी धमकी तिला देता. यावर साधीभोळी मिथिला तिला आपण यावेळी गप्प बसणार नाही असे प्रतिउत्तर तिला देते. सिम्मि आता नेहा विरोधात नवीन काय षडयंत्र रचतेय ?, मिथिला करणार का सिम्मिची सगळ्यांसमोर पर्दाफाश?, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मिळतील.