"रमा राघव" मालिकेत बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन, जाणून घ्या याविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2023 07:00 AM2023-08-29T07:00:00+5:302023-08-29T07:00:07+5:30

रमा राघव मालिकेत रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे, ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे.

In Rama Raghav marathi Serial, Sister Ties Rakhi To Sister hand | "रमा राघव" मालिकेत बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन, जाणून घ्या याविषयी

"रमा राघव" मालिकेत बहिणीने बहिणीला राखी बांधून दिले वचन, जाणून घ्या याविषयी

googlenewsNext

कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ या मालिकेत येत्या मंगळवारी २९ ऑगस्ट आणि बुधवारी ३० ऑगस्टला रात्री नऊ वाजता प्रसारित होणाऱ्या यंदाच्या रक्षाबंधन विशेष भागात एक आगळावेगळा सोहळा रंगणार आहे, ज्यात बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन दिले जाणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच रमा राघव ही मालिका त्यातल्या कौटुंबिक नातेसंबंधामुळे विशेष चर्चेत आहे. अत्यंत स्वार्थी आई, त्यात वडिलांनी केलेली दोन लग्न यामुळे बिघडलेली, नातेसंबंधावरचा विश्वास उडालेली रमा ते पुरोहित घरातल्या वातावरणाने बदलेली सगळ्यांचा विचार करणारी,संस्कारी रमा हा टप्पा प्रेक्षकांना विस्मयचकीत करणारा ठरला आहे. 

माणूस बदलू शकतो,त्याला योग्य संस्कार आणि संगत याची जोड मिळायला हवी. हा पुरोहितांचा विश्वास रमाने सार्थ ठरवला. याचीच एक पुढची पायरी गाठत रमाने तिची सावत्र बहीण आरुषी सोबत  बहीण म्हणून छान नाते फुलवले आहे. या नात्यालाच यंदाच्या रक्षाबंधन सोहळ्यात एक लोभसवाणे वळण मिळणार असून रमाच्या आग्रहातून छोटी बहीण आरुषी, मोठी बहीण रमाला राखी बांधणार आहे.जिथे रमा तिच्या रक्षणाचे वचन देते. 

सध्या ही मालिका रमाराघवच्या नात्याला रमाच्या आईच्या असलेल्या टोकाच्या विरोधाच्या टप्प्यावर आहे, रमाच्या आईने ज्या वरुणसोबत रमाचे लग्न ठरवले आहे, तो आरुषीच्या प्रेमात असून वरुण – आरुषीने लग्न करायचे ठरवले आहे, ज्याला रमाचा पाठिंबा आहे. रक्षाबंधनाच्या या वचनामुळे हा नात्यांचा गुंता अधिकच रंगतदार वळणावर येऊन ठेपला आहे. 
 

Web Title: In Rama Raghav marathi Serial, Sister Ties Rakhi To Sister hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.