"शेवटी तिलाच लांछन लावायचं....", कोलकाता बलात्कार प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 03:28 PM2024-08-17T15:28:06+5:302024-08-17T15:33:24+5:30

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

"In the end, she was the one to be blamed...", the angry reaction of the 'Maharashtrachi Hasyajatra' fame actress in the Kolkata rape case. | "शेवटी तिलाच लांछन लावायचं....", कोलकाता बलात्कार प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

"शेवटी तिलाच लांछन लावायचं....", कोलकाता बलात्कार प्रकरणी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीची संतप्त प्रतिक्रिया

पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या (Kolkata Doctor Rape Murder Case) केल्याची घटना ९ ऑगस्ट रोजी समोर आली. या घटनेमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. देशभरातून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होतेय. या घटनेवर सेलिब्रिटीही सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत पीडितेला न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. दरम्यान, आता यावर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर (Rasika Vengurlekar) हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

रसिका वेंगुर्लेकरने पोस्टमध्ये लिहिले की, सगळं भान तिने जपायंच, मुलगी म्हणून स्वतःला सावरायचं. नीट बसायचं, मोठ्याने नाही हसायचं. चारचौघात कमी बोलायचं. लोक नावं ठेवतील, हे सतत ध्यानात ठेवायचं. थोडक्यात स्वतःसाठी नाहीच जगायचं. सुंदर, सुडौल दिसायचं. जमत असेल, झेपत नसेल तरी डाएट, एक्सरसाइज अंगी बाळगायचं. नाहीतर लग्नाच्या मार्केटमध्ये कुणी पसंत करायचं?? थोडक्यात मुलगी म्हणून स्वतःला सिद्ध करायचं!!


तिने पुढे लिहिले की, शिकायचं, खेळायचं, नाचायचं, गायचं सर्वगुणसंपन्न व्हायचं... स्वयंपाकात पारंगत व्हायचं. मॅरेज मटेरियलल व्हायचं. संस्कारी, संसारी व्हायचं. हार्मोनल इमबॅलन्सला कुरवाळाचं. सेव्हिंग इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान ठेवत हातात वाइन ग्लास घेऊन अपडेटेड पण राहायचं. आणि अरे मुलगी ड्राइव्ह करत असणार असं म्हणून तुम्ही तिला डिग्री करायचं.

वाटेल तसे ओरबाडून तुम्ही शेवटी...

डॉक्टर, अॅक्टर, इन्स्पेक्टर सगळीकडे तिने बरोबरीने उभे राहायचे. सरते शेवटी घरी येऊन तिनेच राबायचं. सुंदर सुडौल म्हणत दिसण्याचं भान तिने जपायचं. नाही तर छछोर, बाहेर ख्याली विशेषण तिच्या नावामागे लागायचे. एखादी छान हसून, मोकळं ढाकळं बोलली की त्याला तुम्ही आमंत्रण समजायचं. कसे हसायचे, कसे बोलायचे, कसे वागायचे यावर तुम्ही बंधन लावायचं, प्रत्येक गोष्टीत तुम्ही तिला जज करायचं. सर्वगुणसंपन्न, मॅरिज मटेरियलचं बिरुद तुम्ही तिच्यावर थोपायचं आणि वाटेल तसे ओरबाडून तुम्ही शेवटी तिलाच लांछन लावायचं, असे तिने पोस्टमध्ये लिहिले.

Web Title: "In the end, she was the one to be blamed...", the angry reaction of the 'Maharashtrachi Hasyajatra' fame actress in the Kolkata rape case.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.