'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, आकाश समोर आलं लकी-वसूच्या नात्याचं सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 17:43 IST2024-11-21T17:42:26+5:302024-11-21T17:43:41+5:30
Punha Kartavya Aahe Serial : 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारीत आहे. आता मालिकेत मनोरंजक वळण येत आहे.

'पुन्हा कर्तव्य आहे' उत्कंठावर्धक वळणावर, आकाश समोर आलं लकी-वसूच्या नात्याचं सत्य
'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe Serial) ही मालिका पुनर्विवाह करणाऱ्या आकाश आणि वसुंधरा यांच्या भोवती आधारीत आहे. आता मालिकेत मनोरंजक वळण येत आहे. विशाखाला कळतं की लकी हाच शार्दुल आहे आणि बनी त्याचा मुलगा आहे. ती डीएनए चाचणीद्वारे हे कन्फर्म करते आणि बनी हा खरोखरच लकीचा मुलगा असल्याचे सिद्ध करते. त्या बदल्यात ती आकाशकडे पैशांची मागणी करते. या सगळ्यात बनीचे अपहरण झालाय.
मालिकेत पाहायला मिळाले की, अपहरणाच्या तपासाची जबाबदारी वसू घेते. बनी बेपत्ता झाल्यामुळे कुटुंबाला धक्का बसतो आणि वसू लकीवर अपहरण घडवून आणल्याचा जाहीर आरोप करते. एका भावनिक क्षणात, वसू लकीसोबतचे तिचे खरे नाते उघड करते. विशाखा आकाशला बनीसोबत एक व्हिडिओ कॉल दाखवते. जयश्री आकाशला थांबवण्याचा प्रयत्न करतेय, पण बनीला वाचवण्याचा आकाशचा निर्धार आहे.
आकाश अपहरणकर्त्यांपर्यंत पोहोचतो त्याच क्षणी आकाशला गोळी लागते. वसू आकाशला ताबडतोब दवाखान्यात घेऊन जाते. पण आकाशचा जीव वसू वाचवू शकेल? लकी आणि विशाखा आपल्या प्रयत्नांमध्ये यशस्वी होतील ? आकाश आणि वसूच्या नात्याचं काय असेल भविष्य ? हे पाहण्यासाठी मालिका पाहावी लागेल.
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेबद्दल
'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका झी टीव्हीवरील 'पुनर्विवाह – जिंदगी मिलेगी दोबारा' या हिंदी मालिकेवर आधारित आहे. या मालिकेत अभिनेता अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर ही नवी जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. अभिनेता अक्षय म्हात्रे हिंदी मालिकेत काम करत होता. त्यानंतर आता तो मराठी मालिकेत काम करताना दिसतो आहे. तसेच अभिनेत्री अक्षया हिंदळकर ही देखील मराठी मालिकांमध्ये झळकली होती. या दोघांसह या मालिकेमध्ये वंदना सरदेसाई, पंकज चेंबूरकर, सुदेश म्हाशीलकर आणि रेयांश जुवाटकर हे कलाकार आहेत.