'तुला जपणार आहे' मालिकेत देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 20:06 IST2025-02-25T20:05:45+5:302025-02-25T20:06:15+5:30

Tula Japnar Aahe : 'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची! अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलंय. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे.

In the series 'Tula Japnar Aahe', Ambika gains special powers by the grace of the goddess. | 'तुला जपणार आहे' मालिकेत देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त

'तुला जपणार आहे' मालिकेत देवीच्या कृपेने अंबिकाला खास शक्ती प्राप्त

'तुला जपणार आहे' मालिकेने (Tula Japnar Aahe) प्रेक्षकांसाठी एक वेगळं पण मनाला भावणारं कथानक छोट्या पडद्यावर आणलंय. मागच्या आठवड्यात तुम्हाला पात्राची ओळख झाली असेलच. पण येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला मालिकेत काय पाहायला मिळेल याची थोडी कल्पना. तर अंबिकाला घरात प्रवेश आणि देवीचा आशीर्वाद मिळाला आहे. देवीच्या कृपेने तिला शक्ती प्राप्त होते. 

जसा घराच्या दरवाजात बांधलेला पवित्र दोरा (दहन) जळतो, तशी अंबिका वेदाचे रक्षण करण्यासाठी घरात प्रवेश करते. वेदाचे प्राण वाचतात पण जे कोण ह्यात सामील आहेत त्यांना धडा शिकवण्याचा निश्चय अंबिका करते. दरम्यान, मीरा आपल्या वडिलांच्या सन्मानासाठी गावात मोठ्या सणाचे आयोजन करण्याचे वचन देते. ती कुंकवाचा कलश उचलून हा सण पूर्ण करण्याचा निर्धार करते. अंबिका घरात वेदाच्या जीवावर उठलेल्या लोकांना धडा शिकवत असतानाच, मायाला जाणवतं की पवित्र दोरा तुटला आहे. आणि नेमकं याच क्षणापासून मायाच्याही जीवाला धोका निर्माण झालाय. तर दुसरीकडे उत्सवाच्या विधी एक-एक करत पूर्ण करायचा मीराचा संघर्ष सुरु आहे. आता मीरा उत्सवाचे सगळे विधी पार करू शकेल ? अंबिका कशाप्रकारे वेदाची रक्षा करेल? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

कथानक
'तुला जपणार आहे' ही कथा आहे, एका आईची! अंबिकाची, जिने आपल्या मुलीच्या संरक्षणाचं व्रत घेतलंय. आत्मारुपात ती तिच्या आजूबाजूला असणार आहे परंतु आत्मारुपात तिला तिच्या जाण्यानंतर दिसतात ते घरातले बदललेले फासे व तिच्या मुलीच्या जीवावर उठलेले लोक, तिच्या जाण्यानंतर मुलगी आणि वडिलांमध्ये झालेली ताटातूट या सगळ्याचा पाठलाग करत अंबिकाच्या प्रार्थनांना प्रतिसाद देत देवीने तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी मीराला पाठवलं, जिची देवीवर नाराजी आहे, जिचा देवीवर विश्वास नाही. अशी मीरा आत्मारूपी अंबिकाला पाहू शकते, तिला स्पर्श करू शकते. या मालिकेतून झी मराठीवर शर्वरी लोहोकरे पुन्हा एकदा कमबॅक करणार आहे. तसेच या मालिकेत नीरज गोस्वामी, प्रतीक्षा शिवणकर, मिलिंद फाटक, पूर्णिमा तळवलकर, निलेश रानडे, मनोज कोल्हटकर, अमोल बावडेकर या कलाकारांची फौज पाहायला मिळणार आहे.

Web Title: In the series 'Tula Japnar Aahe', Ambika gains special powers by the grace of the goddess.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.