पंचवटीतील कोविड केंद्रात कर्मचारी संख्या अपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 06:27 PM2020-07-06T18:27:42+5:302020-07-06T18:32:15+5:30
पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले यांनी मेरीतील डॉ. पंजाबराव देशमुख निवासी वसतिगृह येथील कोविड-१९ केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे.
पंचवटी : पूर्व विधानसभा आमदार राहुल ढिकले यांनी मेरीतील डॉ. पंजाबराव देशमुख निवासी वसतिगृह येथील कोविड-१९ केंद्रात कर्मचाऱ्यांची संख्या अपूर्ण असल्याचे उघडकीस आले आहे.
या कोविड केंद्रात एकूण बेड संख्या १५६ असून, दाखल रु ग्ण एकूण ८३ असून, ५१ पॉझिटिव्ह रु ग्ण आहेत. रु ग्णसंख्या वाढत असल्याने या केंद्रात पुरेसे वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर, लॅब टेक्निशियन, सिस्टर, वार्डबॉय वाढविण्यात यावेत तसेच कॉम्प्युटर व डाटा एन्ट्री आॅपरेटर उपलब्ध करण्यात यावेत. प्रशासनाने रु ग्णांना जेवण, नास्ता व पौष्टिक आहार व आंघोळीला गरम पाणी उपलब्ध करून द्यावे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रशासनाने करावी, अशा सूचना मनपा आयुक्तांना आमदार राहुल ढिकले यांनी केंद्राच्या पाहणीवेळी केल्या.