अन् ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:32 AM2020-02-23T11:32:43+5:302020-02-23T11:34:52+5:30

विशाल ददलानीलाही रोखता आल्या नाहीत भावना...

Indian Idol 11 GRAND FINALE himesh reshammiya cry in show on ranu mandal song | अन् ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया

अन् ‘इंडियन आयडल 11’च्या सेटवर ढसाढसा रडला हिमेश रेशमिया

googlenewsNext
ठळक मुद्देइंडियन आयडॉल 11 च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये भटिंडाचा सनी हिंदुस्तानी, महाराष्ट्राचा रोहित राऊत, कोलकाताचा अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी, अमृतसरचा रिधम कल्याण यांचा समावेश आहे.

आज म्हणजेच 23 फेब्रुवारीला ‘इंडियन आयडल 11’ या लोकप्रिय सिंगींग रिअ‍ॅलिटी शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. यंदाचा इंडियन आयडलचा यंदाचा सीझन कधी नव्हे इतका लोकप्रिय ठरला. साहजिकच ‘इंडियन आयडल 11’चा विजेता कोण होणार, याची उत्सुकता पाहायला मिळतेय. तत्पूर्वी ‘इंडियन आयडल 11’च्या फिनालेपूर्वी एक व्हिडीओ प्रोमो रिलीज करण्यात आलाय. यात ‘इंडियन आयडल 11’चा जज हिमेश रेशमिया ढसाढसा रडताना दिसतोय.  
  फिनालेत पोहोचलेल्या पाच स्पर्धकांनी आपल्या आवडत्या जजसाठी खास गाणे गायले. स्पर्धक अंकोना मुखर्जीने हिमेशने कंपोज केलेले ‘तेरी मेरी कहाणी’ हे गीत गायले.  हे गाणं ऐकल्यावर हिमेश इतका भावुक झाला की ढसाढसा रडू लागला. हिमेशला  रडताना पाहून जज विशाल ददलानी आणि नेहा कक्कर यांनी त्याला आधार दिला.


हिमेशने कंपोज केलेले ‘तेरी मेरी कहाणी’ हे गाणं व्हायरल सेन्सेशन रानू मंडलने गायले आहे.  रेल्वे स्टेशनवर  गाऊन भीक मागणाºया रानूला हिमेश रेशमियाने संधी दिली. त्याच्या या गाण्याने रानू रातोरात स्टार झाली.  हिमेशच्या ‘हॅप्पी हार्डी अँड हिर’ या सिनेमात रानूने एक-दोन नाही तर तब्बल तीन गाणी गायली होती. रानूने गायलेले ‘तेरी मेरी कहाणी’ गीत इंडियन आयडलमध्ये ऐकले तेव्हा हिमेश स्वत:च्या भावना रोखू शकला नाही.


इंडियन आयडॉल 11 च्या टॉप 5 स्पर्धकांमध्ये भटिंडाचा सनी हिंदुस्तानी, महाराष्ट्राचा रोहित राऊत, कोलकाताचा अद्रिज घोष आणि अंकोना मुखर्जी, अमृतसरचा रिधम कल्याण यांचा समावेश आहे. आज रात्री यापैकी एक इंडियन आयडॉल 11 चा विजेता होणार आहे.

Web Title: Indian Idol 11 GRAND FINALE himesh reshammiya cry in show on ranu mandal song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.