OMG!! ‘इंडियन आयडल 11’चा विजेता सनी हिंदुस्तानीची गर्लफ्रेन्ड पाहाल तर पाहातच राहाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2021 16:15 IST2021-07-13T16:14:38+5:302021-07-13T16:15:04+5:30
Sunny Hindustani Girlfriend : किस्मत हो तो ऐसी हो!! लंडनमध्ये एका लाईव्ह म्युझिक शोमध्ये हजारो लोकांच्या गर्दीसमोर दिली प्रेमाची कबुली दिली.

OMG!! ‘इंडियन आयडल 11’चा विजेता सनी हिंदुस्तानीची गर्लफ्रेन्ड पाहाल तर पाहातच राहाल
‘इंडियन आयडल 11’चा ( Indian Idol 11) विजेता सनी हिंदुस्तानी (Sunny Hindustani) हे नाव आज कोण ओळखत नाही? कधीकाळी रस्त्यावर लोकांचे बूट पॉलिश करणारा सनी हिंदुस्तानी याला अखेर त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. इंडियन आयडल 11 ची ट्रॉफी जिंकत सनीने एक वेगळा इतिहास रचला आणि त्याचे नशीबच पालटले. आता काय तर हा सनी प्रेमात पडलाय. तो सुद्धा एका विदेशी तरूणीच्या. रैमडी (Ramdey) असे तिचे नाव.
शनिवारी सनीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून रैमडीसोबतचे लव्ह रिलेशन जाहीर केले होते. आता सनीचा गर्लफ्रेन्डला किस करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.
लंडनमध्ये एका लाईव्ह म्युझिक शोमध्ये सनीने धमाकेदार परफॉर्मन्स दिला. यादरम्यान रैमडीही हजर होती. शो सुरू असताना सनीने रैमडीला स्टेजवर बोलावले आणि हजारो लोकांच्या गर्दीसमोर तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली.
रैमेडीला मिठीत घेत आणि तिच्या गालाचे चुंबन घेत सनीने आपल्या भावना व्यक्त केल्या. या लाईव्ह शोनंतर सनी आपल्या गर्लफ्रेन्डला पिज्जा व कॉफी डेटवरही घेऊन गेला. सनीची गर्लफ्रेन्ड रैमडे ही लेखिका व चित्रकार आहे. तिचे सौंदर्य बघून तर तुम्ही थक्क व्हाल.
इंडियन आयडल 11 मध्ये येण्यापूर्वी सनी बूटपॉलिश करून मिळणा-या पैशातून उपजीविका चालवत होता. इंडियन आयडल 11ने त्याच्या नशीबाला कलाटणी दिली. पंजाबच्या बठिंडा येथील अमरपुरा भागात राहणा-या सनीच्या आवाजाने सर्वांना वेड लावले आहे. सोशल मीडियावरही तो लोकप्रिय झाला आहे.
अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या सनीची आई फुगे विकण्याचा व्यवसाय करत होती. तर सनी स्वत: उपजीविकेसाठी बूट पॉलिश करत असे. गरीब कुटुंबातील सनीने सर्वांना मागे टाकत इंडियन आयडॉलचे विजेतेपद पटकावले.
सनी हा पंजाबच्या भटिंडाचा राहणारा आहे. संगीताचे कुठलेही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न घेता फक्त गाणं ऐकून शिकलेल्या सनीची तुलना नुसरत फतेह अली खां यांच्याशी केली गेली. इंडियन आयडल 11 च्या सर्व जजेसला त्याने आपल्या आवाजाने प्रभावित केले.
विजेतेपद पटकावणा-या सनी हिंदुस्थानीला रोख 25 लाख, इंडियन आयडलच्या ट्रॉफीने गौरविण्यात आले. याचवेळी भुषण कुमार यांच्या टी-सीरीजच्या आगामी सिनेमात गाण्याचे कॉन्ट्रॅक्टही त्याला मिळाली. टाटा कंपनीची नवी एल्ट्रॉज कारही सनी हिंदुस्थानीला मिळाली. दुस-या क्रमांकावर राहिलेल्या रोहितला 5 लाखांचे बक्षीस देण्यात आले.