Indian Idol 12: अरूणिता-पवनदीप बनणार शेजारी शेजारी?, मित्र दानिशने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 02:13 PM2021-08-20T14:13:15+5:302021-08-20T14:13:51+5:30
इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनचा विजेता पवनदीप राजन ठरला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनचा अंतिम सोहळा नुकताच पार पडला आहे. या सीझनचा विजेता पवनदीप राजन ठरला आहे. या संपूर्ण सीझनमध्ये अरूणिता आणि पवनदीप यांच्या रिलेशनशीपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र पवनदीपने अरूणिता नेहमीच आपली चांगली मैत्रीण असल्याचे सांगितले होते. दरम्यान आता असे समजते आहे की, अरूणिता आणि पवनदीप एकाच इमारतीत घर घेणार आहेत. हा खुलासा मोहम्मद दानिशने केला आहे.
इंडियन आयडॉलच्या अंतिम सोहळ्याआधी दिलेल्या मुलाखतीत मोहम्मद दानिशने पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल मुंबईत एकाच इमारतीत आपापले घर घेण्याचा विचार करत आहे.
दानिशने सांगितले की, 'सर्वांनी सोबत राहण्याचे आमचे प्लानिंग आहे. सर्व जवळपास राहू. एकाच इमारतीत सर्वजण आपापल्या घरी राहतील. आमची मैत्री भविष्यातही कायम राहणार आहे. कधीच तुटणार नाही. आम्ही सगळेच वेगवेगळ्या भागातून मुंबईत आलो आहोत. त्यामुळे आम्ही एकत्र आमचे घर घेणार आहोत. आता ही केवळ मैत्री नाही तर एक कुटुंब झाले आहे.
इतकेच नाही तर दानिशने पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलालच्या रिलेशनशीपच्या चर्चेवरही भाष्य केले. तो म्हणाला की, पवनदीप आणि अरूणिता दोघेही आता याकडे लक्ष देत नाहीत. ते दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यांच्यात खूप चांगले बॉन्डिंग आहे आणि तो भविष्यातही असेच राहावे यासाठी मी प्रार्थना करतो.'