Indian Idol 12: अर्चना पूरण सिंगच्या कौतुकाने भारावला दानिश मोहम्मद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 12:09 PM2021-05-20T12:09:11+5:302021-05-20T12:09:39+5:30

इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमध्ये या वीकेंडला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड हजारी लावणार आहेत.

Indian Idol 12: Danish Mohammad overwhelmed by Archana Puran Singh's admiration | Indian Idol 12: अर्चना पूरण सिंगच्या कौतुकाने भारावला दानिश मोहम्मद

Indian Idol 12: अर्चना पूरण सिंगच्या कौतुकाने भारावला दानिश मोहम्मद

googlenewsNext

सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमध्ये या वीकेंडला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड हजारी लावणार आहेत. अप्रतिम परफॉर्मन्सेस तर असतीलच पण त्याच बरोबर या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायण पाहुणे परीक्षकांच्या सांगीतिक प्रवासाबद्दलचे काही अज्ञात किस्से सांगेल. परीक्षक अन्नू मलिक आणि हिमेश रेशमिया देखील सगळ्या परफॉर्मन्सेसचा आनंद घेताना आणि स्पर्धकांचे कौतुक करताना दिसतील, ज्यामुळे स्पर्धकांचा आत्मविश्वास नक्कीच आणखीन वाढेल.
 
दानिश आणि अरुणिताने मुझे नींद न आए आणि घुंघट की आड से दिलबर का ही गाणी सादर केली, त्यावर कुमार सानू म्हणाला, “दानिश, मला तुझे गाणे फारच आवडते. तुझी गाण्याची आणि आवाज लावण्याची पद्धत फार छान आहे. तू एक प्रशिक्षित शास्त्रीय गायक आहेस आणि त्यामुळे तुझे गाणे सगळ्यांच्यात उठून दिसते. तू आपल्या गुरूचा नेहमी मान राखतोस, जे तुझ्या यशाचे गमक आहे. देव तुझे भले करो.

या टिप्पणीनंतर कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड यांनी दानिशला मौला मेरे मौला चित्रपटातील ‘आंखें तेरी कितनी हसीं” हे त्यांचे आवडते गाणे गाण्याची विनंती केली.

 त्यानंतर आदित्य नारायणने अर्चना पूरण सिंगने सोशल मीडियावर दानिशच्या परफॉर्मन्सचे कौतुक केले त्याबद्दल दानिशला विचारले असते तो म्हणाला, “मी अर्चना मॅमचा प्रशंसक आहे आणि मला त्यांनी दिलेला पाठिंबा पाहून मी खरोखर भारावून गेलो आहे. त्यांना माझे गाणे आवडते हे समजल्यानंतर मला माझे पुढचे सगळे परफॉर्मन्स आणखी सरस करण्याची प्रेरणा मिळाली आहे.

Web Title: Indian Idol 12: Danish Mohammad overwhelmed by Archana Puran Singh's admiration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.