Indian Idol 12 फेम सायली कांबळेची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली - "तू ही प्यार... तू ही चाहत..."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 04:49 PM2024-04-26T16:49:25+5:302024-04-26T16:49:51+5:30
Sayali Kamble : सिंगिंग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल'ची प्रसिद्ध स्पर्धक सायली कांबळे सातत्याने चर्चेत येत असते.
हिंदी छोट्या पडद्यावरील सिंगिंग रिएलिटी शो 'इंडियन आयडॉल' (Indian Idol 12) फेम गायिका सायली कांबळे (Sayali Kamble)सातत्याने चर्चेत येत असते. ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. तिची सोशल मीडियावरील पोस्ट बऱ्याचदा चर्चेत येते. सायली कांबळे हिने प्रियकर धवल पाटील याच्याशी २४ एप्रिल, २०२२ रोजी लग्न केले. ती नवऱ्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. दरम्यान आता तिने पतीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
सायली कांबळे हिने पती धवल पाटीलसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, तू मेरी जिंदगी है...तू मेरी हर खुशी है...तू ही प्यार.. तू ही चाहत... तू ही आशिकी है... तिच्या या पोस्टला चाहत्यांची पसंती मिळत आहे. तिच्या या पोस्टवर नेहा कक्कर हिनेही कमेंट केली आहे. तिने पोस्टमध्ये प्यार असे लिहिले आहे. तर या पोस्टवर सायली नवरा धवल याने हार्ट इमोजी शेअर केली आहे.
सायली कांबळे हिने २४ एप्रिल, २०२२ रोजी प्रियकर धवल पाटीलसोबत लग्न केले. महाराष्ट्रीयन पद्धतीने थाटामाटात सायली आणि धवलचा लग्नसोहळा पार पडला होता. या लग्न सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आले होते. सायली आणि धवल एकमेकांना खूप दिवसांपासून डेट करत होते. त्यांच्या लग्नाचे आणि त्यांच्याशी संबंधित विधींचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.