अरूणिता जिंकणार का ‘इंडियन आयडल 12’ची ट्रॉफी? व्हायरल होतोय हा जुना व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 12:05 PM2021-08-15T12:05:05+5:302021-08-15T12:05:50+5:30

Indian Idol 12 Grand Finale : टॉप 6 स्पर्धकांपैकी इंडियन आयडलची ट्रॉफी कोण जिंकणार? हे काही तासानंतर कळेलच. पण तूर्तास अरूणिताचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Indian Idol 12 Grand Finale Arunita Kanjilal Old Video From Sa Re Ga Ma Pa Little Champs Goes Viral | अरूणिता जिंकणार का ‘इंडियन आयडल 12’ची ट्रॉफी? व्हायरल होतोय हा जुना व्हिडीओ

अरूणिता जिंकणार का ‘इंडियन आयडल 12’ची ट्रॉफी? व्हायरल होतोय हा जुना व्हिडीओ

googlenewsNext
ठळक मुद्देअरूणिताने वयाच्या 8 व्या वर्षापासून संगीत शिकणे सुरू केले होते.

‘इंडियन आयडल 12’चा (Indian Idol 12) फिनाले सुरू (Indian Idol 12 Grand Finale) झालाये. भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच 12 तासांचा फिनाले रंगणार आहे. शोचा विजेता कोण बनणार? पवनदीप राजन, अरूणिता कांजीलाल (Arunita Kanjilal), सायली कांबळे, मोहम्मद दानिश, शन्मुखप्रिया आणि निहाल तारो या टॉप 6 स्पर्धकांपैकी इंडियन आयडलची ट्रॉफी कोण जिंकणार? हे काही तासानंतर कळेलच. पण तूर्तास अरूणिताचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ बघितल्यानंतर अरूणिताच शोची विनर होणार, असा दावा चाहते करू लागले आहेत़.

अरूणिताचा हा व्हिडीओ ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमधील आहे. या शोमध्ये अरूणिताने भाग घेतला होता. तेव्हा सिंगर शान व मोनाली ठाकूर या शोचे जज होते. व्हिडीओत अरूणिता ‘तू जहां जहां चलेगा’ हे गाणे गाताना दिसतेय.
हा जुना व्हिडीओ पाहून अरूणिताचे चाहते कमालीचे उत्सुक झाले आहेत. अरूणिताचे कौतुक करताना चाहते थकत नाहीयेत. तीच इंडियन आयडल 12 जिंकणार, असा विश्वासही अनेकांनी व्यक्त केला आहे.

अरूणिताने वयाच्या 8 व्या वर्षापासून संगीत शिकणे सुरू केले होते. वयाच्या 10 व्या वर्षी झी बांगलाच्या ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. इतकेच नाही, तिने हा शो जिंकला होता. अरूणिताने सिंगर शानसोबत अनेक इंटरनॅशनल शो केले आहेत.

Web Title: Indian Idol 12 Grand Finale Arunita Kanjilal Old Video From Sa Re Ga Ma Pa Little Champs Goes Viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.