Indian Idol 12: इंडियन आयडॉल शो आहे स्क्रिप्टेड?, एलिमिनेशननंतर आशिष कुलकर्णीने सांगितले यामागचे सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:49 PM2021-07-15T12:49:00+5:302021-07-15T12:49:55+5:30
इंडियन आयडॉलचा १२ या शोमधून नुकताच स्पर्धक आशिष कुलकर्णी बाहेर पडला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग शो इंडियन आयडॉलचा १२ वा सीझन सातत्याने चर्चेत येत असतो. या शोमधील स्पर्धकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नुकताच या शोमधून स्पर्धक आशिष कुलकर्णी बाहेर पडला आहे. त्यानंतर आशिषच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शोला खूप ट्रोल केले. एलिमिनेशननंतर दुःखी झालेल्या आशिष कुलकर्णीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्टदेखील लिहिली होती. इंडियन आयडॉल १२ चा ग्रॅण्ड फिनाले १५ ऑगस्टला पार पडणार आहे.
एलिमिनेशनबद्दल आशिष कुलकर्णी म्हणाला की, मी पुण्यात राहणारा सामान्य सिंगर आहे.बऱ्याच वर्षांपासून मी प्रयत्न करत होतो की संगीत क्षेत्रात माझे काम व्हावे. सर्वकाही होते, आई वडिलांचा पाठिंबा होता मात्र ती ओळख मिळत नव्हती. मात्र इंडियन आयडॉलमध्ये माझी निवड झाली आणि माझ्या गायन कौशल्याला ओळख मिळाली. मला त्यांनी ट्रेन केले, माझे मार्गदर्शन केले त्यामुळे मी इथपर्यंत पोहचू शकले. मी टॉप ७ पर्यंत पोहचलो. मी कधी असा विचार केला नव्हा. माझे जीवन बदलण्यासाठी ही खूप मोठी संधी होती आणि इथपर्यंत पोहचणे माझ्यासाठी मोठी बाब होती.
शो स्क्रिप्टेड असल्याची टीका बऱ्याचदा सोशल मीडियावर होताना दिसते. त्याबद्दल आशिषने म्हटले की, अमित कुमार आणि किशोर दा यांची गाणी ऐकून आम्ही मोठे झालो आहोत. तर त्यांचे जी काही मते आणि विचार आहेत ते एक विद्यार्थी म्हणून ते स्वीकारून त्यावर काम करणे आमची जबाबदारी आहे.जेव्हा मी आमच्या सह स्पर्धकांसोबत यावर चर्चा केली तेव्हा त्यांनाही हेच वाटते की त्यांचे जे काही मत आहे ते आपल्याला समजून घेऊन त्यात सुधारणा करणे ही आपली जबाबदारी आहे. एक स्पर्धक म्हणून आम्ही फक्त आपल्या गाण्यावर लक्ष देतो. आमचे लक्ष फक्त प्रतिक्रियावर असते. शोबद्दल त्यांनी जे काही म्हटले होते त्यावर पूर्णपणे निर्मात्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. त्याबद्दल आम्हाला स्पर्धकांना काहीच माहित नव्हते आणि आम्ही लक्षदेखील देत नाही.