Indian Idol 12 निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, रातोरात टीमला दिली सुट्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2021 01:53 PM2021-05-29T13:53:00+5:302021-05-29T13:53:37+5:30

इंडियन आयडॉलचा १२वा सीझन सातत्याने वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत येत आहे.

Indian Idol 12 makers made a big decision, gave the team a night off | Indian Idol 12 निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, रातोरात टीमला दिली सुट्टी

Indian Idol 12 निर्मात्यांनी घेतला मोठा निर्णय, रातोरात टीमला दिली सुट्टी

googlenewsNext

कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. मालिका आणि चित्रपटाच्या शूटिंगलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे शूटिंगचे ठिकाण इतर राज्यात हलविण्यात आले आहे. लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉलचेही शूटिंग लोकेशनही बदलण्यात आले. लॉकडाउनमुळे इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी संपूर्ण टीमसोबत दमणमध्ये शूटिंग केले आहे. त्यामुळे संपूर्ण टीमला मुंबईतून दमण येथे शिफ्ट केले आहे. 

इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी दमणमध्ये एक महिन्याचे बॅकअप एपिसोड्सचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूट पूर्ण झाल्यानंतर टीम मुंबईत परतली आहे. आता तुम्ही म्हणाल की संपूर्ण टीमला रजा कशी देण्यात आली. शोच्या निर्मात्यांनी संपूर्ण टीमला एक ब्रेक दिला आहे. आता मुंबईत शूटिंगला परवानगी दिल्यानंतरच शोच्या चित्रीकरणाला सुरूवात होईल.


ही माहिती इंडियन आयडॉल १२चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने दिली आहे. त्याने ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, दमणमध्ये आमची टीम चार दिवसात एकूण ८ भागांचे शूट केले होते. आमच्याकडे एक महिन्यांपर्यंत संपूर्ण कंटेट आहे. आम्ही महाराष्ट्र सरकारच्या अनलॉक निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत. मला वाटते की मुंबईत राहणे योग्य आहे.


तसेतर महाराष्ट्रात अनलॉक होईल, असे चित्र सध्या दिसत नाही. अशात इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी हा निर्णय कसा घेतला त्याबद्दल शोच्या सूत्रसंचालकाला काहीच माहिती नाही. सांगितले जात आहे की, हा निर्णय निर्मात्यांनी अचानक घेतला आहे. याबद्दल आधीच कोणती तयारी केली नव्हती.

Web Title: Indian Idol 12 makers made a big decision, gave the team a night off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.