Indian Idol 12 : पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलालनं व्यक्त केलं प्रेम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2021 14:20 IST2021-10-25T14:19:48+5:302021-10-25T14:20:04+5:30
पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलाल पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

Indian Idol 12 : पवनदीप राजन आणि अरूणिता कांजीलालनं व्यक्त केलं प्रेम
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय हिंदी सिंगिंग रिएलिटी शो इंडियन आयडॉल १२चा विजेता पवनदीप राजन आणि उपविजेती अरूणिता कांजीलाल सतत चर्चेत येत असतात.शोमध्ये त्या दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा सुरू होता. शो संपल्यानंतरही ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांनी लग्न केले असल्याची चर्चा रंगली होती. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.
आता पवनदीप आणि अरूणिताने प्रेम व्यक्त केले आहे पण ते त्यांच्या मंजूर दिल या म्युझिक अल्बममध्ये. त्या दोघांचा म्युझिक व्हिडीओ 'मंजूर दिल' नुकताच रसिकांच्या भेटीला आला आहे.
मंजूर दिल या म्युझिक अल्बममध्ये पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल रोमँटिक अंदाजात पहायला मिळत आहेत. पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल आता या म्युझिक व्हिडिओमध्ये आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. पवनदीप आणि अरुणिता यांनी हे गाणे गायले आहे.
दिग्दर्शक राज सूरानी यांनी तयार केलेले हे रोमँटिक गाणे आहे. अराफत मेहमूद यांच्या लेखणीतून हे सुंदर गाणे साकार झाले आहे. तर पवनदीप राजन आणि आशिष कुलकर्णी यांचे संगीत आहे. पवनदीप-अरुणिताच्या स्वर साजात गायलेले 'मंजूर दिल' हे गाणे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.