Indian Idol 12 : विशाल दादलानीने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2021 01:28 PM2021-06-01T13:28:06+5:302021-06-01T13:28:30+5:30

इंडियन आयडॉल १२ वरून सुरू असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आता या शोचा परीक्षक विशाल दादलानीने मोठा निर्णय घेतला आहे.

Indian Idol 12: Vishal Dadlani took a big decision, fans were shocked | Indian Idol 12 : विशाल दादलानीने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले हैराण

Indian Idol 12 : विशाल दादलानीने घेतला मोठा निर्णय, चाहते झाले हैराण

googlenewsNext

इंडियन आयडॉल १२ वरून सुरू असलेला वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. दरम्यान आता या शोचा परीक्षक विशाल दादलानीने मोठा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे चाहते हैराण झाले आहेत. म्युझिक कंपोझर आणि  गायक विशाल दादलानी आता इंडियन आयडॉल १२मध्ये दिसणार नाही. त्याने सांगितले की, इंडियन आयडॉल १२ मध्ये कमबॅक करणार नाही. विशाल दादलानी मागील तीन सीझनचे या शोचे परिक्षण करतो आहे. त्याच्यासोबत नेहा कक्कर आणि हिमेश रेशमिया परीक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळत आहे. 


महाराष्ट्रात लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानंतर शूटिंगलाही बंदी घालण्यात आली. त्यानंतर इंडियन आयडॉल १२च्या निर्मात्यांनी शूटिंग दमणमध्ये करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विशाल दादलानीसोबत नेहा कक्कर, हिमेश रेशमियाने शूटिंगसाठी दमणला जाण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी शोमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत मनोज मुंताशिर आणि अनु मलिक पहायला मिळत आहेत. 


आता इंडियन आयडॉल १२मध्ये नेहा कक्कर आणि अनु मलिक कधी कधी पहायला मिळत आहे. तर विशाल दादलानीने शोमध्ये परतण्यास नकार दिला आहे. ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, जोपर्यंत लॉकडाउन संपत नाही तोपर्यंत तो शोमध्ये परतणार नाही.


तर ईटाइम्सच्या रिपोर्टनुसार, इंडियन आयडॉल १२चा सूत्रसंचालक आदित्य नारायणने विशाल दादलानी शोमध्ये परतणार नाही, याबद्दल सांगितले होते की
विशाल मागील वर्षी लोणावलामध्ये शिफ्ट झाला आणि फॅमिलीसोबत राहत आहे. त्यांना लोणावळा वरून ड्राइव्ह करत दमणला जाणे आणि परत घरी येणे करायचे नाही. त्यामुळे फॅमिलीला कोरोना व्हायरसच्या संक्रमण होण्याची शक्यता आहे. 

Web Title: Indian Idol 12: Vishal Dadlani took a big decision, fans were shocked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.