इंडियन आयडलचा हा विजेता अनेक वर्षांनंतर परतला या मंचावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 04:04 PM2018-07-27T16:04:31+5:302018-07-28T06:00:00+5:30
इंडियन आयडलच्या होतकरू गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील काही महान गायक त्यांच्यासोबत मंचावर आले होते. मंचाला धन्य करणारा त्यापैकी एक गायक ‘सुभानल्लाह’ गायक श्रीराम चंद्र होता. इंडियन आयडल ५ चा हा विजेता लखीमपूरच्या सौरभ वाल्मिकीला पाठिंबा देण्यासाठी आला होता.
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने अलीकडेच इंडियन आयडलच्या या सत्रातील आपल्या सर्वोत्कृष्ट १४ गायकांची नावे जाहीर केली आहेत. देशभरातील गायकांमधून निवडलेले हे सुपरस्टार गायक २८ आणि २९ जुलैच्या गाला एपिसोडमध्ये रात्री आठ वाजता आपल्या अद्भुत आवाजाने सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील इंडियन आयडल शोचा मंच भारून टाकणार आहेत. या होतकरू गायकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशातील काही महान गायक त्यांच्यासोबत मंचावर असणार आहेत. मंचाला धन्य करणारा त्यापैकी एक गायक आहे ‘सुभानल्लाह’ गायक श्रीराम चंद्र. इंडियन आयडल ५ चा हा विजेता लखीमपूरच्या सौरभ वाल्मिकीला पाठिंबा देण्यासाठी आला होता.
श्रीरामला पाहून विशाल दादलानी म्हणाला की, श्रीराम संगीत, नृत्य आणि नाट्य या तिन्ही कलांमध्ये पारंगत आहे आणि तो एक चतुरस्र परफॉर्मर आहे. या टिप्पणीमुळे श्रीराम चांगलाच खूश झाला आणि त्याने विशालला मिठी मारली. त्याने आपल्या अलीकडच्या रेस 3 चित्रपटातील अल्ला दुहाई हे गीत सादर केले आणि त्या गीतावर सर्वांना नृत्य करण्यास भाग पाडले. याविषयी विशाल सांगतो, “श्रीराम मनोरंजन व्यवसायात ‘ट्रिपल थ्रेट’ म्हणून ओळखला जातो. तो जे करतो ते उत्तमच करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो, मग ते संगीत असो, नृत्य असो किंवा अभिनय असो. तो एक ऑल राउंडर परफॉर्मर आहे. श्रीराम या इंडियन आयडलच्या भव्य प्रिमियरसाठी सौरभ वाल्मिकी या आपल्या स्पर्धकाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आला आहे.”
श्रीरामला त्याच्या अनुभवाबद्दल विचारले असता तो सांगतो, “विशालच्या टिप्पणीने मी प्रचंड खूश झालो. मला खूप छान वाटते आहे. इंडियन आयडलमध्ये परत आल्याचा आनंद आहे आणि ही वेळ खास आहे. माझ्या मनात जुन्या आठवणी दाटून आल्या आहेत. कारण मी पाचव्या सत्राचा विजेता होतो आणि आता मी पार्श्वगायक आहे. नेहा माझी चांगली मैत्रीण आहे आणि तिला या स्थानावर पाहून मला खूप आनंद होत आहे. ती छान कामगिरी करते आहे. नुकत्याच एका मालिकेत आम्ही दोन गाणी एकत्र म्हटली आहेत. माझ्या कारकिर्दीला आकार देण्यात या मंचाने मला खूप मदत केली आहे. सर्व स्पर्धकांना मी खूप खूप शुभेच्छा देतो.”