कोण ठरणार इंडियन आयडॉल मराठीचा पहिला स्पर्धक? 'या' दिवशी रंगणार ग्रँड फिनाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 18:20 IST2022-04-18T18:18:27+5:302022-04-18T18:20:23+5:30
Indian idol marathi: लवकरच या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्यामुळे इंडियन आयडॉल मराठीचा पहिला स्पर्धक प्रेक्षकांना मिळणार आहे.

कोण ठरणार इंडियन आयडॉल मराठीचा पहिला स्पर्धक? 'या' दिवशी रंगणार ग्रँड फिनाले
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअॅलिटी शो म्हणून इंडियन आयडॉलकडे पाहिलं जातं. आजवर या शोमुळे कलाविश्वाला अनेक दिग्गज गायक,गायिका मिळाले आहेत. त्यामुळे हा शो लोकप्रिय रिअॅलिटी शोच्या यादीत कायम प्रथम स्थानावर असल्याचं पाहायला मिळतं. हिंदी कलाविश्वात हा शो गाजल्यानंतर त्याचं मराठी व्हर्जनही प्रेक्षकांच्या भेटीला आलं. विशेष म्हणजे लवकरच आता या शोचा ग्रँड फिनाले रंगणार आहे. त्यामुळे इंडियन आयडॉल मराठीचा पहिला स्पर्धक प्रेक्षकांना मिळणार आहे.
'अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा' अशी टॅगलाईन असलेल्या या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून स्पर्धकांनी सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे स्पर्धकांपैकी एकाची विजेता म्हणून निवड करण्यात येणार आहे. म्हणूनच, इंडियन आयडॉल मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता कोण होणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, येत्या १८ ते २० एप्रिलपासून हा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. त्यापूर्वी विजेत्या स्पर्धकाला मिळणाऱ्या ट्रॉफीचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.