इंडियन आयडॉलचे नवे पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2018 11:19 AM2018-06-29T11:19:30+5:302018-06-29T11:33:56+5:30
सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी, लोकप्रिय गायिका नेहा कक्कड आणि गायक व संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी.
पावसाळ्याच्या सुरुवातीबरोबरच सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन इंडियन आयडॉलचा एक नवीन, ताजा अध्याय सुरू करत आहे मौसम म्यूजिकका. हा एक असा मंच आहे, ज्या मंचाने संगीतातील प्रतिभावंतांसाठी प्रसिद्धीचा मार्ग खुला करून दिला आहे. यंदा त्याच्या 10व्या सीजनमध्ये उत्कृष्टतेची ग्वाही देत केवळ प्रतिभावान स्पर्धकांमुळेच नाही तर त्यांच्या प्रेरक कथांमुळे कार्यक्रमाचा दर्जा आणखी उंचावण्यास इंडियन आयडॉल सज्ज आहे. या सत्रासाठी परीक्षकाची जबाबदारी स्वीकारली आहे. सुप्रसिद्ध गायक व संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी, लोकप्रिय गायिका नेहा कक्कड आणि गायक व संगीत दिग्दर्शक अनू मलिक यांनी. सर्वांच्या लाडका मनीष पॉलने सूत्र संचालन आपल्या हाती घेतले आहे. नेहा कक्कडबद्दल सांगायचे तर, ती इंडियन आयडॉलमध्ये स्पर्धक बनून आली होती व आता त्याच कार्यक्रमात परीक्षक बनली आहे. विशाल म्हणतो, “होय, नेहाची गोष्ट अविश्वसनीय आहे. एखाद्या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येऊन त्याच कार्यक्रमात परीक्षक बनणे ही खूप मोठी गोष्ट आहे. शिवाय आमच्या 3 परीक्षकांच्या पॅनलमधील एक परीक्षक म्हणून नेहा स्पर्धकांची बाजू आमच्यापेक्षा जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेऊ शकेल. मी टेलिव्हीजनवरील कोणत्याच स्पर्धेत कधीच स्पर्धक म्हणून गेलेलो नाही. मी कॉलेजमधील अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलेला आहे पण टीव्ही कार्यक्रमात स्पर्धक म्हणून जाणे हे त्यापेक्षा खूप वेगळे आहे. एखाद्या रियालिटी शोमध्ये स्पर्धक असतात, त्यांना खूप मेहनत आणि निष्ठा लागते. नेहाने हे केलेले आहे. सर्व गायकांबद्दल ती अधिक संवेदनशील देखील आहे. मला हे देखील वाटते की, ती कॅमेर्यासाठीच बनली आहे. कॅमेर्यासमोर ती जास्त खुलते. आम्हाला तिच्याकडून सल्ला घ्यावा लागणार आहे!”