फक्त आऊटडोर लोकेशन्सवर चित्रित होणारी हासिल भारताची पहिली टेलिव्हिजन मालिका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2017 10:40 AM2017-10-04T10:40:49+5:302017-10-04T16:10:49+5:30
जगभरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय. याला बॉलिवूडप्रमाणे हिंदी मालिकाही अपवाद राहिलेलं नाही.लवकरच हासिल मालिकेत परदेशी लोकेशन्सचे दर्शन ...
ज भरातील प्रसिद्ध लोकेशन्सनी पर्यटकांना कायम भुरळ घातलीय. याला बॉलिवूडप्रमाणे हिंदी मालिकाही अपवाद राहिलेलं नाही.लवकरच हासिल मालिकेत परदेशी लोकेशन्सचे दर्शन रसिकांना घडणार आहे. तेही एका ठराविक भागासाठी नाहीतर या मालिकेचे सगळ्या भागात तुम्हाला अनेक आकर्षक लोकेशन्स पाहायला मिळतील.अशा प्रकारे संपूर्णपणे आऊटडोअर शूट होणारी ही पहिलीच मालिका असल्याचे बोलले जात आहे.'हासिल' मालिकेत झायद खान, निकिता दत्ता आणि वत्सल शेठ असे फेमस कलाकार आहेत. या भव्य शा नाट्यात अनेक नागमोडी वळणे असतील, जी प्रेक्षकांना या मालिकेशी खिळवून ठेवतील.भले मोठे बजेट असलेल्या या मालिकेची टीम मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरावी यासाठी रात्रंदिवस झटत आहे.लक्झरी कार्स,नयनरम्य आऊटडोर लोकेशन्स आणि मनाची पकड घेणारे कथानक यांसारख्या घटकांमुळे 'हासिल' ही एक मालिका ठरणार आहे.
शिवाय, ही भारतीय टेलिव्हिजनवरील पहिली मालिका आहे ज्यात कोणताही ठराविक सेट नाही. क्रिएटिव्ह टीमने खूप रिसर्च करून भारतात आणि विदेशात विविध लोकेशन्स निवडत मालिकेचे शूट केले आहे.अलीकडे या टीमने मॉरिशस येथे दोन आठवडे चित्रीकरण केले. त्यावेळी या मालिकेतील प्रमुख कलाकारांनी चित्रीकरणादरम्यान आणि त्यानंतर येथील रमणीय सुमुद्रकिनार्यावर खूप वेळ घालवला आणि वॉटर स्पोर्ट्सचा देखील आनंद लुटला. हासिलच्या प्रोमोच्या चित्रीकरणासाठी क्रिएटिव्हटीमने दोन हेलिकॉप्टर्स व या भव्य मालिकेस साजेशा 4-5 स्पोर्ट्स कार्स ठेवल्या होत्या.या मालिकेत आंचलची भूमिका साकारणार्या निकिता दत्ताने सांगितले, “सिनेमॅटिक दृष्टिकोनातून पाहील्यास एकाच निश्चित सेट नसणे हे फायद्याचे आहे. आम्ही नवनवीन लोकेशन्स शोधत आहोत आणि या वैविध्यामुळे मालिका अधिक रंगतदार आणि जिवंत होत आहे. मात्र प्रॉडक्शन टीमसाठी लॉजिस्टिक्सचे व्यवस्थापन करणे हे एक आव्हान आहे. शिवाय मी यापूर्वी केलेल्या मालिका ठरविक सेटवरील असल्याने हा बदल मला आवडतो आहे. आपण दररोज अनेक तास सेटवर असतो आणि रोज रोज त्याच ठिकाणी प्रवास करून जाणे हे काहीसे कंटाळवाणे होते. परंतु आम्ही रोज नवीन जागी चित्रिकरण करत असल्यामुळे आम्हाला तसा कंटाळा येत नाही.”हासिल एक रोमॅंटिक थ्रिलर आहे. यामध्ये झायद रणवीर रायचंदची आणि वत्सल कबीर रायचंदची भूमिका करत आहेत, जे दोघे पडद्यावर भाऊ असून गर्भश्रीमंत असे बिझनेसमन आहेत. क्रिएटिव्ह टीम ही दक्षता घेत आहे की, ही भव्य दिव्य मालिका पाहताना मालिकेचे वैभव प्रेक्षकांच्या डोळ्यात भरेल.”