'देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही'; इंद्रा-दिपू होणार कायमचे विभक्त?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:48 PM2022-02-16T15:48:15+5:302022-02-16T15:48:59+5:30

Man udu udu zal: अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु,  दिपू देशपांडे सरांची मुलगी असल्याचं सत्य इंद्रासमोर आल्यानंतर त्याला जबर धक्का बसला आहे.

Indra doesn't deserve to love Deshpande sirs daughter Will Indra-Dipu be separated forever | 'देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही'; इंद्रा-दिपू होणार कायमचे विभक्त?

'देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही'; इंद्रा-दिपू होणार कायमचे विभक्त?

googlenewsNext

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. या मालिकेतील कलाकारांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं होतं. परंतु,  दिपू देशपांडे सरांची मुलगी असल्याचं सत्य इंद्रासमोर आल्यानंतर त्याला जबर धक्का बसला आहे. इतकंच नाही तर त्याने हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

अलिकडेच इंद्राला दिपू देशपांडे सरांची मुलगी असल्याचं समजतं. दिपूचे हे सत्य समोर आल्यानंतर तिने एवढी मोठी गोष्ट आपल्यापासून लपवली याचा धक्का इंद्राला बसतो. त्यामुळे तो दिपूसोबत असलेलं नातं संपवण्याचा निर्णय घेतो. यात दिपू अनेकदा तिच्या अशा वागण्यामागचं कारण सांगण्याचा प्रयत्न करते. मात्र, इंद्रा तिचं काहीही ऐकून घ्यायला तयार होत नाही. 

झी मराठीने अलिकडेच या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये इंद्राची समजूत काढण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी दिपू त्याला एक पत्र पाठवते. हे पत्र तो वाचत असताना दिपूचं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. सगळं विसरुन जा, असा सल्ला सत्तू देतो. त्यावर मॅडम देशपांडे सरांची मुलगी आहेत. आणि देशपांडे सरांच्या मुलीवर प्रेम करायची इंद्राची लायकी नाही, असं इंद्रा म्हणतो.

दरम्यान, एकीकडे इंद्रा नाराज असल्यामुळे दिपू प्रचंड टेन्शनमध्ये आहे. तर, दिपूसोबत नातं तोडायचा निर्णय घेतल्यामुळे इंद्राही प्रचंड दु:खी आहे. त्यामुळे आता या दोघांमधील गैरसमज, मतभेद कधी मिटतील? ही जोडी पुन्हा एकत्र येईल का? या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.
 

Web Title: Indra doesn't deserve to love Deshpande sirs daughter Will Indra-Dipu be separated forever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.