इंद्रनील सेनगुप्ताचे नेमके बिनसले तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 11:05 AM2018-02-19T11:05:56+5:302018-02-19T16:35:56+5:30

टीव्ही मालिकांमध्ये पुरुष अभिनेते हे केवळ दाखविण्यासाठी असतात.पण खरे महत्त्व महिला अभिनेत्रींनाच असते असे सांगितले जाते.टीव्हीवरील मालिकांचे विषय आणि ...

Indranil Sengupta is still alive? | इंद्रनील सेनगुप्ताचे नेमके बिनसले तरी काय?

इंद्रनील सेनगुप्ताचे नेमके बिनसले तरी काय?

googlenewsNext
व्ही मालिकांमध्ये पुरुष अभिनेते हे केवळ दाखविण्यासाठी असतात.पण खरे महत्त्व महिला अभिनेत्रींनाच असते असे सांगितले जाते.टीव्हीवरील मालिकांचे विषय आणि हाताळणी दिवसेंदिवस प्रगत होत असून त्यातील विषय हे महिलाकेंद्रित होत आहेत.त्यामुळे काही अभिनेत्यांच्या मनात मालिकांमध्ये आपल्याला फारसे महत्त्व दिले जात नसल्याची भावना मूळ धरू लागली आहे.‘निम्की मुखिया’ मालिकेत ‘ब्लॉक डेव्हलपमेंट अधिकारी’ (बीडीओ) अभिमन्यू सिंहची भूमिका रंगविणारा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ताची भूमिका चांगल्या वाटेवर सुरू झाली.त्याला निम्कीचा मार्गदर्शक असल्याचे दाखविले जात होते.तसेच तो निम्कीवर एकतर्फी प्रेम करीत असल्याचे सूचित केले जात होते.यथावकाश त्याच्या व्यक्तिरेखेचाही विकास केला जाईल आणि त्याच्या प्रेमाच्या दृष्टिकोनाचा विस्तार केला जाईल, असे त्याला सांगण्यात आले होते. पण तसे काहीच घडले नाही. आता तर निम्कीचे लग्न बब्बूसिंह याच्याशी होत आहे. परिणामी सुरुवातीला महत्त्वाची वाटत असलेली इंद्रनीलची व्यक्तिरेखा आता दुय्यम ठरत चालली आहे.सेटवरील एका सूत्राच्या म्हणण्यानुसार,गृहित धरले जात असल्याची भावना इंद्रनीलच्या मनात निर्माण झाली असून त्याच्या भूमिकेचे चित्रीकरण आता रोज होण्याऐवजी आठवड्यातून केवळ तीनच दिवस होऊ लागले आहे.मालिकेचे कथानक ज्या दिशेने जात आहे, ते पाहता मालिकेतील आपली व्यक्तिरेखा आता महत्त्वाची राहिलेली नाही,असे इंद्रनीलचे मत बनले आहे.इंद्रनीलचे नक्कीच काहीतरी बिनसले आहे, असे दिसते.

मुलींना तयार होण्यास अधिक वेळ लागतो, अशी आपली समजूत असते.पण आता ती गोष्ट इतिहासजमा झाली आहे. कारण ‘निम्की मुखिया’ मालिकेत अभिमन्यू रायची भूमिका साकारणारा अभिनेता इंद्रनील सेनगुप्ता याला चित्रीकरणासाठी तयार होण्यास त्याच्या महिला सहकलाकारांपेक्षा अधिक वेळ लागतो.मालिकेच्या निर्मितीशी जवळच्या सूत्रांच्या माहितीनुसार संबंध असलेल्या एका सूत्राने सांगितले, “त्याच्यामुळे अनेकदा अन्य कलाकारांना वाट बघत बसावं लागतं. त्याच्यामुळे अनेकदा चित्रीकरणास उशीर होतो. बूट असो की केशभूषा, तो प्रत्येक बाबतीत  तो खूप बारकाईने लक्ष घालतो. या गोष्टी जो पर्यंत परफेक्ट होत नाही तोपर्यंत तो पुढच्या कामाला लागत नाही. असून त्याला सर्व गोष्टी जागच्या जागी हव्या असतात.”पडद्यावर आपण सुंदर दिसावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. पण त्यासाठी इतरांचा खोळंबा करण्याची गरज नाही.त्याला सगळ्या गोष्टी परफेक्ट लागतात त्यामुळे छोट्या पडद्यावरचा मि.परफेक्शनिस्ट म्हणून त्याला सेटवरही त्या मि.परफेक्शनिस्ट म्हणूनच ओळखले जाते.गेल्या काही दिवसांपासून इंद्रनीलचा एक पाय मुंबईत,तर दुसरा कोलकात्यात आहे,याला कारणही तसे खास आहे.सध्या तो  एका बंगाली चित्रपटाचही शूटिंगमध्ये बिझी आहे.त्यामुळे सध्या तो मालिका आणि चित्रपट या दोन्ही गोष्टींचे शूटिंग करत असल्यामुळे ‘निम्की मुखिया’च्या चित्रीकरणासाठी त्याला मुंबईत राहावे लागते आणि त्याच्या बंगाली चित्रपटांतील भूमिकांसाठी त्याला कोलकात्यात राहावे लागते.बंगाली चित्रपटांमुळे आपण आपल्या संस्कृतीशी जोडलेलो राहतो, असे त्याचे मत असून त्यामुळे त्याला बंगाली चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यास खूप आवडते.

Web Title: Indranil Sengupta is still alive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.