'इंद्रायणी' मालिकेतील 'इंदू' आता मोठी होणार, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका; प्रोमो रिलीज
By देवेंद्र जाधव | Updated: February 27, 2025 12:05 IST2025-02-27T12:05:16+5:302025-02-27T12:05:59+5:30
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' मालिकेत आता ही अभिनेत्री लहानग्या इंदूची भूमिका साकारताना दिसणार आहे (indrayani)

'इंद्रायणी' मालिकेतील 'इंदू' आता मोठी होणार, 'ही' अभिनेत्री साकारणार भूमिका; प्रोमो रिलीज
कलर्स मराठीवरील 'इंद्रायणी' (indrayani) मालिका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते. या मालिकेतील लहानग्या इंदूचा निरागस अभिनय सर्वांचं मन जिंकून गेलाय. 'इंद्रायणी'मालिका कलर्स मराठीवर गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु आहे. मालिकेचा सुंदर विषय आणि कलाकारांचा सुंदर अभिनय या गोष्टींमुळे 'इंद्रायणी' मालिका TRP मध्ये कायम अव्वल असते. अशातच 'इंद्रायणी' मालिकेतील इंदूची भूमिका आता बदलण्यात येणार आहे. छोटी इंदू आता मोठी होऊन एका नव्या अभिनेत्रीची मालिकेत एन्ट्री होणार आहे.
आता ही अभिनेत्री साकारणार 'इंद्रायणी'?
कलर्स मराठीने काही तासांपूर्वी 'इंद्रायणी' मालिकेचा नवीन प्रोमो रिलीज केलाय. यात छोटी इंदू आता मोठी झालेली दिसतेय. मोठी इंदू वीणा हातात घेऊन पुन्हा एकदा कीर्तन करायला सज्ज आहे. या प्रोमोत मोठ्या इंदूचा चेहरा दाखवला नसला तरीही ती कोण याचा शोध चाहत्यांनी घेतलाय. अभिनेत्री कांची शिंदे यापुढे इंदूची भूमिका साकारणार आहे. याआधी बालकलाकार साची भोईर इंदूची भूमिका साकारत होती. आता मोठ्या इंदूच्या भूमिकेत कांची शिंदे पाहायला मिळणार आहे.
कांची शिंदेबद्दल...
कांची शिंदे सुद्धा सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि कोरिओग्राफर आहे. कांचीने याआधी कलर्स मराठीवरीलच 'पिरतीचा वणवा उरी पेटला' मालिकेत अभिनय केलाय. आता 'इंद्रायणी' मालिकेनिमित्ताने कांची प्रेक्षकांचं मन जिंकायला सज्ज आहे. 'इंद्रायणी' मालिकेत संतोष जुवेकर, अनिता दाते हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. ही मालिका कलर्स मराठीवर सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल.