‘नजर’च्या रंगभूषाकारांनी घेतली ‘गेम ऑफ थ्रोन्स’पासून प्रेरणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 02:15 PM2018-07-14T14:15:10+5:302018-07-14T21:00:00+5:30

कलाकारांना करण्यात आलेले विशेष मेक-अप आणि अंगावर काटा आणणारे पार्श्वसंगीत यामुळे या मालिकेची भीतीदायकता वाढेल आणि तिला एक अमानवी आणि रहस्यमय छटा प्राप्त होईल असे ‘नजर’ या मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे.

Inspiration from 'Game of Thrones' by 'Nazar' actors | ‘नजर’च्या रंगभूषाकारांनी घेतली ‘गेम ऑफ थ्रोन्स’पासून प्रेरणा

‘नजर’च्या रंगभूषाकारांनी घेतली ‘गेम ऑफ थ्रोन्स’पासून प्रेरणा

googlenewsNext

‘स्टार प्लस’वर लवकरच ‘नजर’ ही मालिका सुरू होणार आहे. ही मालिका अमानवी शक्तींवर आधारित असून ही काहीशी फॅण्टसी सदृश्य मालिका आहे. आपल्याभोवती चेटकिणींची काळोखी शक्ती लपेटून असते आणि तिचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो, अशी या मालिकेच्या कथानकाची संकल्पना आहे. या मालिकेला सर्व दृष्टीने उत्कृष्ट करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असून यासाठी ते प्रचंड मेहनत घेत आहेत.
‘नजर’ या मालिकेच्या निर्मात्यांनी या मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट रंगभूषाकारांना करारबद्ध केले आहे. या रंगभूषाकारांनी ‘गेम ऑफ थ्रोन्स’ या मालिकेतील व्यक्तिरेखांवरून प्रेरणा घेऊन या मालिकेतील व्यक्तिरेखांचा मेकअप केला आहे. विशेषत: त्यातील चेटकीण मेलिसांन्द्रेच्या मेकअपवरून त्यांनी प्रेरणा घेतली आहे.
‘नजर’मधील डायनची रंगभूषा ही ‘गेम ऑफ थ्रोन्स’मधील बहुतांशी मेलिसांन्द्रे ऊर्फ रेड वुमन या व्यक्तिरेखेवर आधारित असणार आहे. मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेची रंगभूषा ही वेगळी आणि हटके असावी असे निर्मात्यांचे म्हणणे असल्याने त्यांनी त्यावर बरेच संशोधन केले आहे. त्यानुसारच कलाकारांच्या रंगभूषेसाठी उत्कृष्ट रंगभूषाकारांना नेमण्यात आले आहे. या मालिकेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “नजर ही एक भूत-पिशाच्चावर आधारित मालिका असल्याने या मालिकेतील व्यक्तिरेखांच्या रंगभूषांवर ‘गेम ऑफ थ्रोन्स’ मालिकेतील व्यक्तिरेखांचा बराच प्रभाव पडला आहे. यातील बहुतांश कलाकारांना भरपूर रंगभूषा करण्याची गरज आहे आणि त्यांच्या रूपात आम्हाला कसलीही तडजोड करायची नव्हती. यातील प्रत्येकाचा लूक हा विचारपूर्वक तयार करण्यात आला असून त्यांचं दिसणं हे वास्तववादी वाटावं आणि या कलाकारांनी आपल्या व्यक्तिरेखांना न्याय द्यावा, अशी त्यामागील अपेक्षा होती.”
कलाकारांना करण्यात आलेले हे विशेष मेक-अप आणि अंगावर काटा आणणारे पार्श्वसंगीत यामुळे या मालिकेची भीतीदायकता वाढेल आणि तिला एक अमानवी आणि रहस्यमय छटा प्राप्त होईल असे मालिकेच्या टीमचे म्हणणे आहे. प्रेक्षकांना नजर ही वेगळ्या साच्यातील मालिका नक्कीच आवडेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. नजर ही मालिका लवकरच स्टार प्लस या वाहिनीवर सुरू होणार आहे.  

Web Title: Inspiration from 'Game of Thrones' by 'Nazar' actors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.