'सारं काही तिच्यासाठी'मध्ये रंजक वळण, ओवी आणि निशीच्या नशिबात संसाराचं सुख लिहिलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 04:17 PM2024-07-19T16:17:25+5:302024-07-19T16:18:09+5:30
Saara Kahi Tichyasathi Serial : 'सारं काही तिच्यासाठी' मालिका रंजक वळणावर आली आहे.
'सारं काही तिच्यासाठी' (Saara Kahi Tichyasathi Serial) मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले. या मालिकेतील सर्वच पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. मालिका रंजक वळणावर आली आहे. निशी सासरी म्हणजे नीरजच्या मुंबईतल्या घरी आली आहे आणि तिथे निशीच्या स्वागतासाठी पार्टी आयोजित केली आहे. पार्टीत नीरज आणि निकिता सतत एकमेकांच्या सोबत आहेत. हे पाहून निशीला एकटं वाटतंय. आपण या वातावरणात मिसफीट आहोत असा कॉम्प्लेक्स तिला वाटतोय.
निशी एका कोपऱ्यात जाऊन दादा आणि आईच्या आठवणीने रडते. उमाला काहीतरी जाणवतं आणि ती रघुनाथला सांगते. माझं मन सांगतंय निशीला कसला तरी त्रास होतोय. उमाच्या सांगण्यावरून रघुनाथ निशीला फोन करतो. निशी फोन बघून स्वत:ला सावरते आणि सांगते की माझ्या स्वागतासाठी इकडे मोठा समारंभ ठेवलाय. तरीपण निशी काहीतरी लपवतेय असं उमाला वाटतंय. चारुची घरातली लुडबुड ही वाढली आहे. त्यामुळे मंजू आणि लालीमध्ये भांडणं सुरु झालेत आणि त्यावेळी लाली ओवीला त्यासाठी जबाबदार धरते.
नीरज बिझनेसमध्ये नवीन असल्याने तो त्यात पूर्णपणे व्यस्त आहे. निशीकडे आपलं दुर्लक्ष होतंय ह्याची त्याला जाणीव आहे पण त्याचाही नाईलाज आहे. निशीला सुद्धा त्याची ओढाताण दिसतेय म्हणून तीची नीरजकडे कसलीही तक्रार नाही. खरंच काय लिहलंय ओवी आणि निशीच्या नशिबात? त्यांना संसार सुख मिळेल का? हे जाणून घेण्यासाठी पाहावी लागेल 'सारं काही तिच्यासाठी' मालिका.