'शिवा' मालिकेत रंजक वळण, शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 15:49 IST2024-10-14T15:48:13+5:302024-10-14T15:49:32+5:30
'शिवा' (Shiva Serial) मालिकेत सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत.

'शिवा' मालिकेत रंजक वळण, शिवाने वाचवले सीताईचे सौभाग्य
'शिवा' मालिका (Shiva Serial) सुरूवातीपासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. मालिकेत रोज काही ना काही घडामोडी घडताना दिसत आहे. या मालिकेत सीताईच्या मनात आपल्यासाठी जागा निर्माण करण्याचे शिवाचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सीताई चिडलेली असताना, आशू शिवाला सीताईच्या मनाप्रमाणे वागण्याचा सल्ला देतो.
शिवा घरातील सर्व काम करते आणि घरच्यांसाठी वेळेत नास्ता बनवते. पण तरीही सीताई तिला टोमणे मारते. कीर्ती सीताईला तिच्या गैरहजेरीत शिवाने केलेल्या प्रतापाबद्दल सांगते. माणसांना आपलंसं केलं की त्यांच्या गोष्टी पण आपल्याश्या वाटतात असं आशू म्हणताच सीताईला धक्का बसतो. शिवा सीताईला मनावण्याची आणायची जबाबदारी घेते. सीताई रस्त्याने जात असताना तेथे काही चोर येतात आणि सीताईच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून घेतात. सीताई शिवाला काहीही कर पण माझं सौभाग्य मला परत हवं आहे असं सांगते.
सीताईच्या मनात शिवाबद्दल प्रेम निर्माण होईल?
शिवा चोरांचा पाठलाग करते आणि त्यांना पकडून धडा शिकवते आणि सीताईची माफी मागायला लावते. शिवाच्या हाताला जखम झालेली पाहताच सीताई स्वतःचा साडीचा पदर फाडते आणि जखमेवर बांधते. या सगळ्यामुळे आता तरी सीताईच्या मनात शिवा बद्दल प्रेम निर्माण होईल? सीताई शिवाला सून म्हणून स्वीकारेल ? हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.