मेरी कोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:15 AM2019-03-04T07:15:00+5:302019-03-04T07:15:00+5:30

मेरी कोम केसरीच्या आयुष्यात एक मसीहा बनून अवतरणार असून त्या केसरीला तिचे स्वप्न साकार करण्याबरोबरच समाजाची पर्वा न करण्याचा सल्ला देणार आहेत.

International Boxing Champion Mary Kom to make a guest appearance on COLORS’ Kesari Nandan’ | मेरी कोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार

मेरी कोम पाहुण्या कलाकार म्हणून झळकणार

googlenewsNext

मालिका 'केसरी नंदन' ने आपल्या प्रेक्षकांची मने जिंकली आहेत आणि आपल्या मुलीच्या इच्छा आकांक्षा त्यांचे परंपरांनी हात बांधलेल्या अवस्थेतही वडील सहकार्य करतात आणि ती कुस्तीपटू होण्याचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात.  या शो मध्ये आता लवकरच  आकर्षक  ट्वीस्ट येणार असून यात एका  मोठ्या वळणावर आंतरराष्ट्रीय  स्तरावरील भारतीय बॉक्सिंग पटू मेरी कोम एका कुस्ती स्पर्धेच्या प्रमुख पाहण्या म्हणून आपल्याला दिसणार आहेत. मेरी कोम केसरीच्या आयुष्यात एक मसीहा बनून अवतरणार असून त्या केसरीला तिचे स्वप्न साकार करण्याबरोबरच  समाजाची पर्वा न करण्याचा सल्ला देणार आहेत.


या शो मधील आपल्या प्रवेशा विषयी बोलतांना मेरी कोम म्हणतात “ केसरी नंदन हा शो तरूण मुलींनी त्याच्या आवडीच्या खेळांत  करीयर करण्यास प्रोत्साहन देणारा शो आहे आणि  लिंगभेद न मानता खेळात चमकण्यासाठी प्रोत्साहन देणारा असा हा खेळ आहे.  जगभरातील पहिल्या क्रमांकाची बॉक्सर बनण्याच्या माझ्या प्रवासात मी सुध्दा या नियमांच्या विरोधात उभी राहिले आणि विजेती ठरत गेले.  त्याचप्रकारे केसरी सुध्दा सामाजिक दबावापुढे न झुकता शिकत आहे आणि मी या गोष्टीला नेहमीच प्रोत्साहन देत असते.  मी या टिमला शुभेच्छा देते.”

सध्या सुरू असलेल्या कथानका नुसार हनुमंत (मानव गोहिल)वर मोठे कर्ज आहे आणि पिकाला आग लागल्यामुळे तो ते कर्ज फेडू शकत नाहीये.  त्याच वेळी  जगत (शोएब अली) आणि  केसरी हे फ्री स्टाईल कुस्तीच्या स्पर्धेविषयी ऐकतात ज्याच्या बक्षीसाची रक्कम ही १ लाख रूपये आहे.  आपल्या वडिलांना मदत करण्यासाठी जगत या कुस्ती स्पर्धेत भाग घेतो.  जगत स्पर्धा जिंकण्याचा खूप प्रयत्न करतो पण स्पर्धा जिंकू शकत नाही. केसरी जगत स्पर्धा जिंकू शकत नाही यावर विश्वास ठेवत नाही आणि  ती यावेळी विजेत्या स्पर्धकालाच आव्हान देते.  मेरीकोम यांनी नुकताच  आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत इतिहास घडवला आहे त्या या स्पर्धेच्या प्रमुख पाहुण्या असणार आहेत.  त्या गांवकर्‍यांशी स्त्रीपुरूष समानते विषयी बोलतात आणि  कशा प्रकारे त्यांचे  स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करतात याबद्दल माहिती देतात.  

केसरी ही स्पर्धा जिंकेल का आणि  हनुमंत ला त्याच्या कर्जातून मुक्ती मिळेल का  की  ती मुलगी असल्याच्या दबावाला बळी पडेल?  या सर्व प्रश्नांचा उलगडा आगामी भागात होणार आहे.


 

Web Title: International Boxing Champion Mary Kom to make a guest appearance on COLORS’ Kesari Nandan’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.