प्रेग्नेंट आहे गोपी बहू? ३८ वर्षीय देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी हलणार पाळणा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 05:09 PM2024-07-20T17:09:43+5:302024-07-20T17:10:22+5:30

Devoleena Bhattacharjee : छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी आई होणार असल्याचे बोलले जात आहे.

Is Gopi Bahu pregnant? The cradle will move to the house of 38-year-old Devolina Bhattacharjee | प्रेग्नेंट आहे गोपी बहू? ३८ वर्षीय देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी हलणार पाळणा

प्रेग्नेंट आहे गोपी बहू? ३८ वर्षीय देवोलिना भट्टाचार्जीच्या घरी हलणार पाळणा

छोट्या पडद्यावरील गोपी बहू म्हणजेच अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) आई होणार असल्याचे बोलले जात आहे. देवोलिनाच्या जवळच्या एका सूत्राने देवोलिनाच्या गरोदरपणाची बातमी दिली आहे. देवोलिनाचा पती शाहनवाज शेखसोबत ती तिच्या पहिल्या अपत्याची अपेक्षा करत असल्याचे सूत्राने सांगितले आहे. जरी ती अद्याप गरोदरपणाच्या सुरुवातीच्या दिवसात आहे. वैयक्तिक कारणांमुळे अभिनेत्रीने यावर मौन बाळगले आहे. संधी मिळताच ती स्वतः याबद्दल सांगणार आहे.

देवोलिनाच्या जवळच्या सूत्राने न्यूज१८ शोमध्ये सांगितले की, 'ती गरोदर आहे, पण ती अजून जाहीर करू इच्छित नाही. देवोलिनाला तिच्या वैयक्तिक बाबी लाइमलाइटपासून दूर ठेवायला आवडतात. त्यामुळे तिची गर्भधारणा मीडियाचे लक्ष वेधून घेऊ इच्छित नाही. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ती स्वतः ही खुशखबर जाहीर करेल, असे सूत्राने म्हटले आहे.

देवोलिनाच्या प्रेग्नेंसीबद्दल गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. अलिकडेच तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्याला पाहून नेटकऱ्यांनी दावा केला की ती प्रेग्नेंट आहे आणि म्हणून ती तिचा बेबी बंप लपवत आहे. मात्र, जेव्हा न्यूज १८ शोने अभिनेत्रीशी अफवांवर चर्चा केली तेव्हा तिने तिच्या गर्भधारणेची पुष्टी केली नाही किंवा नाकारली नाही. तिच्या बोलण्यातून ती प्रेग्नंट असल्याचे जाणवले. जरी तिने याबाबत काहीही स्पष्ट विधान दिलेलं नाही.

माझ्याबद्दल अनेक अफवा आहेत

तिच्या गरोदरपणाच्या अफवांना उत्तर देताना देवोलिना म्हणाली होती की, जेव्हा मला अफवांवर विचारणारे मेसेज किंवा कॉल येतात तेव्हा मी चिडते. जर हे माझे वैयक्तिक आयुष्य असेल तर मला वाटेल तेव्हा सांगेन. मला त्रास देऊ नका किंवा काळजी करू नका. प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ आहे. माझ्याबद्दल अनेक अफवा आहेत ज्या मला हसवतात. मला आश्चर्य वाटते. याबाबत कोणीही काही करू शकत नाही.

Web Title: Is Gopi Bahu pregnant? The cradle will move to the house of 38-year-old Devolina Bhattacharjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.