प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई? मीडियाला सेटवर येण्यास घातली बंदी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2024 14:14 IST2024-08-13T14:14:06+5:302024-08-13T14:14:44+5:30
लोकप्रिय अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा आहे.

प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई? मीडियाला सेटवर येण्यास घातली बंदी
प्रसिद्ध अभिनेत्री प्रेग्नेंट असून ती लवकरच चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर करणार असल्याची चर्चा आहे. तिच्या मालिकेच्या सेटवर मीडियाला येण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. तर ही अभिनेत्री म्हणजे कुंडली भाग्य फेम श्रद्धा आर्या (Shraddha Arya).
श्रद्धा आर्या प्रेग्नंट असल्याचं म्हटलं जात आहे. नवभारतच्या रिपोर्टनुसार, श्रद्धा आणि राहुल त्यांच्या पहिल्या बाळाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही दिवसांपुर्वी श्रद्धाने कुंडली भाग्यच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला होता. आता नुकतंच ती कामावर परतली आहे. ती कामावर परतल्यानंतर मालिकेच्या सेवटर मीडियाला येण्यास बंदी घालण्यात आल्याचं बोललं जातं आहे. पण, श्रद्धाने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधीही ती गरोदर असल्याच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत.
16
अभिनेत्रीने एक वर्ष डेट केल्यानंतरनोव्हेंबर 2021 रोजी बॉयफ्रेंड राहुल नागलसोबत लग्न केलं होतं. राहुल नागल हा नौदल अधिकारी आहे. श्रद्धा आज पतीसोबत सुखाचा संसार करत आहे. सोशल मीडियावर ती पतीसोबतचे रोमँटिक व्हिडिओ शेअर करत असते. आता श्रद्धा करिअर आणि संसार दोन्ही सांभाळत आहे. श्रद्धा हिची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे.
श्रद्धाच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'कलावनिन कधाली' या तमिळ चित्रपटातून झाली. श्रद्धाने तिच्या करिअरची सुरुवात जरी चित्रपटातून केली असली तरी तिला खरी ओळख टीव्हीमुळेच मिळाली. 'मैं लक्ष्मी तेरे आंगन की' या शोमधून त्याला लोकप्रियता मिळाली. यानंतर तिने तुम्हारी पाखी, ड्रीम गर्ल आणि कुंडली भाग्य या मालिकांमध्ये काम केले.