ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाच्या रिलेशनशीपला झाली ४ वर्षे पूर्ण, शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 01:55 PM2021-07-30T13:55:21+5:302021-07-30T13:55:48+5:30

ईशा आणि ऋषी बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

Isha Keskar and Rishi Saxena's relationship is 4 years old, shared post | ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाच्या रिलेशनशीपला झाली ४ वर्षे पूर्ण, शेअर केली पोस्ट

ईशा केसकर आणि ऋषी सक्सेनाच्या रिलेशनशीपला झाली ४ वर्षे पूर्ण, शेअर केली पोस्ट

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री ईशा केसकर सध्या कोणत्या मालिकेत काम करताना दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर सक्रीय आहे. ईशा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते. तसेच ती काहे दिया परदेस फेम अभिनेता ऋषी सक्सेनासोबतच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत येत असते. नुकतेच त्या दोघांच्या रिलेशनशीपला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या सुंदर क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपले प्रेम व्यक्त केले आहे. 

ईशा केसकर हिने इंस्टाग्रामवर ऋषी सक्सेनासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, चार वर्षे झाले. आय लव्ह यू माझा फणस.


तर ऋषी सक्सेनानेदेखील इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओचा कोलाज शेअर करत लिहिले की, ४ वर्षे झाले आणि आणखी बरेच व्यतित करायचे आहेत.


ईशा आणि ऋषी यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 

ईशा आणि ऋषी बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. या दोघांची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते. ते त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात.

ईशा ऋषी सक्सेनासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन देखील चर्चेत असते. गेल्या चार वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करत आहेत. चला हवा येऊ द्याच्या मंचावर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांना खूप भावते.

काहे दिया परदेस या मालिकेत अभिनेता ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका केली होती. ऋषी हा अमराठी असला तरी त्याने त्याच्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. लवकरच तो 'छुमंतर' सिनेमात दिसणार आहे. ईशाबाबत सांगायचे तर ती शेवटची माझ्या नवऱ्याची बायको मालिकेत दिसली होती.

Web Title: Isha Keskar and Rishi Saxena's relationship is 4 years old, shared post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.