स्त्री म्हणून आपण जे साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाही!, ईशा केसकरची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2021 17:19 IST2021-03-08T17:16:45+5:302021-03-08T17:19:56+5:30
. ईशा सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

स्त्री म्हणून आपण जे साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाही!, ईशा केसकरची पोस्ट चर्चेत
महिलांचे मनोधैर्य व स्त्रीत्वाच्या सन्मानार्थ जगभरात ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. अभिनेत्री ईशा केसकरने ही जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा सर्व स्त्रीयांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या आहेत. . ईशा सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. या माध्यमातून तीआपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ तो शेअर करत असते. स्वत: चा फोटो शेअर करत स्त्री म्हणून आपण जे साध्य करू शकतो त्याला मर्यादा नाही! जागतिक महिला दिनाच्या खुप शुभेच्छा! असे कॅप्शन तिने दिले आहे.
ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत रिलेशनशीपमध्ये आहे. दोघे बऱ्याचदा सोशल मीडियावर एकमेकांचे फोटो शेअर करून प्रेम व्यक्त करत असतात. या दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. चाहते त्यांच्या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात. ईशा केसकर अभिनेता ऋषी सक्सेनासोबत असलेल्या रिलेशनशीपला घेऊन देखील चर्चेत असते. गेल्या तीन वर्षांपासून दोघे एकमेकांना डेट करतायेत.चला हवा येऊ द्याच्या सेटवर ऋषी आणि ईशा यांची ओळख झाली होती. दोघांमधील रोमाँटिक केमिस्ट्री त्यांच्या फॅन्स आवडते. काहे दिया परदेस या मालिकेत ऋषी सक्सेनाने शिवची भूमिका साकारली होती.