​एक था राजा एक थी राणी या मालिकेत इशा सिंग साकारणार दुहेरी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2017 06:19 AM2017-03-09T06:19:37+5:302017-03-09T11:49:37+5:30

इशा सिंगने इश्क का रंग सफेद या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. ...

Isha Singh was one of the two actors in the series Raja Ek Tha Rani | ​एक था राजा एक थी राणी या मालिकेत इशा सिंग साकारणार दुहेरी भूमिका

​एक था राजा एक थी राणी या मालिकेत इशा सिंग साकारणार दुहेरी भूमिका

googlenewsNext
ा सिंगने इश्क का रंग सफेद या मालिकेद्वारे तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. या मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली होती. त्यानंतर इशा सध्या एक था राजा एक थी राणी या मालिकेत काम करत आहे. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता या मालिकेत ती दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहे. पुढील काही भागांमध्ये मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे.
नैना आणि राणी यांचे आत्मे राणीच्या मृत्यूचे खरे कारण राजाला कळावे यासाठी प्रयत्न करत असल्याचे आपल्याला गेल्या काही भागांपासून पाहायला मिळत आहे. आता राजा नैनाच्या प्रेमात पडला आहे आणि यामुळे राणीच्या आत्म्याच्या मनात असूया निर्माण झाली आहे आणि त्यामुळे तिने नैनावर सूड उगवण्याचे ठरवले आहे. राजा आणि नैना यांना शक्य तेवढे एकमेकांपासून वेगळे ठेवण्यासाठी राणीच्या आत्म्याचा प्रयत्न सुरू आहे. या सगळ्यात आता राणीचे भूत नैनाच्या मागे लागणार असून आता नैना आणि राणी या दोन्ही भूमिका इशा साकारणार आहे. इशा तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारत असल्याने खूप खूश आहे. याबाबत ती सांगते, "मी पहिल्यांदाच दुहेरी भूमिका साकारणार असल्याने पुढील भागांचे चित्रीकरण सुरू व्हायची मला प्रचंड उत्सुकता लागली आहे. मला या मालिकेतील राणीची व्यक्तिरेखा ही सुरुवातीपासूनच आवडते. ती अतिशय श्रीमंत असली तरी अतिशय दयाळू आहे. तर नैना ही अतिशय सरळ, साधी आणि निरागस मुलगी असून आपल्या आईचे स्वप्न साकारण्याचा ती प्रयत्न करत आहे. या दोन्ही व्यक्तिरेखांचे स्वभाव हे एकमेकांपेक्षा खूपच वेगळे असल्याने या दोन्ही भूमिका साकारण्याासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे."





Web Title: Isha Singh was one of the two actors in the series Raja Ek Tha Rani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.