इशा सिंगची आई आली मदतीला धावून
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2017 03:06 PM2017-01-05T15:06:11+5:302017-01-05T15:06:11+5:30
एक था राजा एक थी राणी या मालिकेत एका महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. या दृश्यात इशा सिंगने ...
ए था राजा एक थी राणी या मालिकेत एका महत्त्वाच्या दृश्याचे चित्रीकरण केले जात होते. या दृश्यात इशा सिंगने ठरावीक कानातले घालणे गरजेचे होते. या दृश्याच्या काही भागाचे चित्रीकरण झाले होते आणि त्यानंतर पुन्हा पुढचा शॉर्ट सुरू होणार होता. पण यादरम्यान इशाने तिचे कानातले काढून कुठेतरी ठेवले आणि चित्रीकरण सुरू व्हायच्या वेळी कानातले नसल्याचे तिच्या लक्षात आले. काही केल्या हे कानातले कुठे ठेवले आहेत हे तिला आठवतच नव्हते.
कानातले हरवल्याची गोष्ट इशाने लगेचच तिच्या टीमला सांगितली आणि मालिकेची संपूर्ण टीमच तिचे कानातले शोधण्यात बिझी झाली. पण कोणालाच हे कानातले मिळत नव्हते. ते कानातले मिळाल्याशिवाय पुन्हा चित्रीकरणाला सुरुवातदेखील करणे अशक्य होते.
इशाची आई चित्रीकरणाच्यावेळी अनेकवेळा तिच्या सोबतच असते. त्यामुळे कानातले शोधण्याची जबाबदारी शेवटी इशाच्या आईने स्वतःवर घेतली. तिने इशाला एका ठिकाणी शांतपणे बसवले आणि शेवटी कानातले तू कुठे ठेवले होते हे आठवण्याचा प्रयत्न कर असे सांगितले. ती चित्रीकरणाच्या ब्रेकमध्ये कुठे कुठे गेली होती हे तिला विचारले. इशाची आई प्रश्न विचारत असतानाच इशाला कानातले कुठे ठेवले आहे हे अचानक आठवले.
केवळ दहा मिनिटांत इशाच्या आईच्या कानातले शोधून दिले. याविषयी इशा सांगते, "प्रत्येक आई ही सुपरहिरो असते. माझ्या आईमुळे आमच्या चित्रीकरणाचा संपूर्ण दिवस वाचला. कारण त्या कानातल्यांशिवाय चित्रीकरण करणे शक्यच नव्हते. मी माझ्या एका सहकलाकाराच्या मेकअप रूपमध्ये ते कानातले विसरले होते आणि ते तिच्या रूमच्या वॉश बेसिंगजवळ एका कागदात गुंडाळून ठेवले होते त्यामुळे ते कोणालाच दिसले नाहीत."