इशांत भानुशाली दिसणार रुप...मर्द का नया स्वरुपमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 10:54 AM2018-06-11T10:54:34+5:302018-06-12T09:45:45+5:30

कलर्सचा लेटेस्ट प्रस्ताव रुप...मर्द का नया स्वरुप ने प्रेक्षकांची करमणूक केली आहे. रुप (अफान खान) नावाच्या एका आठ वर्षांचा  ...

Ishant seems to be looking forward ... in the new look of the man | इशांत भानुशाली दिसणार रुप...मर्द का नया स्वरुपमध्ये

इशांत भानुशाली दिसणार रुप...मर्द का नया स्वरुपमध्ये

googlenewsNext
र्सचा लेटेस्ट प्रस्ताव रुप...मर्द का नया स्वरुप ने प्रेक्षकांची करमणूक केली आहे. रुप (अफान खान) नावाच्या एका आठ वर्षांचा  मुलाची ही कथा असून तो स्त्री आणि पुरूषांचे वागणे ठरविणाऱ्या पितृप्रधान संस्कृतीला प्रश्न विचारत आहे. कथे मध्ये मनोरंजक कलाटणीची भर टाकण्यासाठी रणवीर नावाच्या एका नवीन पात्राचा प्रवेश होणार आहे आणि ती भूमिका करत आहे लोकप्रिय बालकलाकार इशांत भानुशाली.

इशांत हा रुपचा चुलतभाऊ असून तो वाघेला कुटुंबात उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आला आहे. तो अतिशय खोडकर मुलगा असून कोणत्याही त्रासदायक परिस्थितीतून कसे निसटावे हे त्याला चांगले माहित आहे. रुपला मुलींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या गोष्टी आवडतात, तर रणवीर त्याच्या वयाच्या इतर मुलां प्रमाणे आहे. रणवीरच्या माचो आणि निर्भय वागण्यामुळे शमशेर आणि कौशल्या बुवा त्याच्यावर फिदा आहेत आणि त्यांना रुपने तसे व्हावे असे वाटत आहे. उत्सुक असलेल्या इशांत भानुशालीने सांगीतले, “माझे पात्र असलेला रणवीर हा एक खोडकर मुलगा आहे आणि त्याला रुपवर दादागिरी करायला आवडते पण त्याच बरोबर तो त्याला माचो बनण्यासाठी प्रोत्साहन सुध्दा देतो. रुप...मर्द का नया स्वरुप मध्ये सहभागी होण्यासाठी आणि अशा टॅलेंटेड टीम सोबत काम करण्याचा मला आनंद झाला आहे. अफान, तशीन आणि अनन्या हे माझे नवे मित्र झाले आहेत आणि आम्ही सर्वजण सेटवर मजा करतो.''


या मालिकेत यश टोंक मुख्य भूमिका साकारत आहे. आपल्या भूमिकेविषयी सांगताना यश म्हणाला होता की, "रुप-मर्द का नया स्वरुप या मालिकेची संकल्पना अतिशय वेगळी आहे आणि माझे पात्र एक पुरूष असल्याच्या सर्व वैशिष्ट्यां विषयी आपल्याला विचार करायला लावते. मर्दानीपणाचा अभिमान असलेला एक दरोगा शमशेर सिंह कोणालाही उत्तर देत नाही आणि पुरूषीपणाचे चिन्ह म्हणून ताकतीचे प्रदर्शन करतो. पण, मी या देशातील सर्व पुरूषांना विनंती करतो की स्त्रियांना सुद्धा पुरूषांसारख्याच भावना आणि महत्वाकांक्षा असतात हे जाणून घ्या आणि आम्ही त्या सुद्धा समाजाचा एक समान हिस्सा आहेत हे कबूल केले पाहिजे

Web Title: Ishant seems to be looking forward ... in the new look of the man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.