आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 16:25 IST2023-05-02T16:24:51+5:302023-05-02T16:25:51+5:30
Aai kuthe kay karte: इशाचे आजी-आजोबा अनिशच्या घरी साखरपुडा आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले आहेत. तर इशा आणि अनिशमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

आई कुठे काय करते: इशाच्या लग्नात पुन्हा विघ्न; अनिशसोबतही मोडणार साखरपुडा?
छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत कायम नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात. अलिकडेच अरुंधतीने आशुतोषसोबत लग्न केलं असून त्यांच्या सुखी संसाराला सुरुवात झाली आहे. तर, दुसरीकडे अनिरुद्ध-संजना यांच्यात वादाची ठिणगी पडत आहे. यामध्येच आता इशा अनिशसोबत साखरपुडा मोडणार असल्याचं दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये इशा आणि अनिश त्यांच्या साखरपुड्याविषयी चर्चा करत आहेत. अनिशसोबत होणारा साखरपुडा माझ्याच मर्जीने होईल, असा हट्ट इशाने धरला आहे. त्यावरुन या दोघांमध्ये वाद होतो. इतकंच नाही तर जमत नसेल तर साखरपुडा कॅन्सर करु, असं अनिश इशाला सांगतो. त्यावर इशाही रागात त्याच्याकडे पाहते. त्यामुळे इशा खरोखरच हा साखरपुडा मोडणार की काय हा नवा प्रश्न उपस्थित झाला आहे.
दरम्यान, दुसरीकडे इशाचे आजी-आजोबा अनिशच्या घरी साखरपुडा आणि लग्नाची बोलणी करण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे आता या मालिकेत पुन्हा एकदा इशाच्या आयुष्यात नवं वादळ येणार का? अरुंधती या सगळ्यातून इशाला कसं सावरेल असे प्रश्न निर्माण होत आहेत. मात्र, या प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना मालिका पाहिल्यावरच मिळणार आहेत.