'इश्क में मरजावा'च्या कलाकारांची गोव्यात धमला मस्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:30 AM2019-01-29T06:30:00+5:302019-01-29T06:30:00+5:30
इश्क में मरजावामध्ये मधल्या कलाकारांनी नुकतेच गोव्यात जाऊन शूटिंग केले आहे. एक रहस्यमय माणूस दीपच्या (अर्जुन बिजलानी) जीवनाच्या मागे लागला आहे
इश्क में मरजावामध्ये मधल्या कलाकारांनी नुकतेच गोव्यात जाऊन शूटिंग केले आहे. एक रहस्यमय माणूस दीपच्या (अर्जुन बिजलानी) जीवनाच्या मागे लागला आहे. हा रहस्यमय माणूस, दीपला मारण्याचा हेतू धरून वावरताना दिसतोय. अचानक पार्टी संपत असताना, दीप दिसेनासा होतो आणि आरोही (निया शर्मा) दीपच्या नाहिसे होण्यामागील रहस्यमयता शोधण्याचा प्रयत्न करते. या रहस्यमय कोड्याचे तुकडे एकत्र करताना आरोही दीपला शोधण्यासाठी गोव्याला येते. दीप तिच्यासोबतचे त्याचे वागणे बदलतो. प्रेक्षकांना दीपचा वेगळा अवतार पाहायला मिळतोय. कलाकार आणि कर्मचारी गोव्याच्या बीचवर काही अगदी वास्तविक सिक्वेन्सचे चित्रीकरण केले आहे. विविध सीनसाठी टीमने सिन्क्वेरिम आणि कॅन्डोसिम शोधले आहेत. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत अर्जुन बिजलानी, निया शर्मा, शोएब इब्राहिम आणि अलिशाने गोव्याचा आनंद घेतला. पॅक अप करण्याआधी त्यांनी गोव्यातील जेवणाचा आनंद तर घेतलाच शिवाय काही साहसी खेळांचाही आनंद लुटला.
अर्जुन बिजलानी म्हणाला, “इश्क में मरजावा मधील रोमांचित करणाऱ्या वळणांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. आगामी सिक्वेन्स साठी आम्ही गोव्यात चित्रीकरण केले आहे त्यामुळे प्रेक्षक त्यांच्या खुर्चीत खिळून बसणार आहेत. तेथे काही गुपिते उघड होणार आहेत त्यांचा त्यांना धक्का बसणार आहे. गोव्याच्या आकर्षक बीचेस वर चित्रीकरण करताना आम्हाला अतिशय मजा आली. स्थानिक लोकांनी आमचे ज्या तऱ्हेने स्वागत केले ते तर मी विसरूच शकत नाही. आम्हाला मिळालेले आशीर्वाद आणि प्रेम अतिशय भरभरून होते”.
निया शर्मा म्हणाली, “आमचे चित्रीकरणाचे वेळापत्रक अतिशय व्यस्त होते तरीही मी पुन्हा एकदा गोव्याच्या प्रेमात पडले. आम्ही चित्रीकरण करत असलेला सिक्वेन्स अतिशय रोमांचक होतो आणि मला खात्री आहे की प्रेक्षक सुध्दा त्यांच्या टेलिव्हिजन स्क्रीनला खिळून बसतील. माझा विश्वास आहे की गोवा स्कूटर वरून पाहिला पाहिजे आणि चित्रीकरणाच्या वेळापतत्रकातून वेळ काढत मी स्कूटर चालविण्याची संधी घेतलीच. दिवसभर आम्ही खूप काम करत होतो आणि संध्याकाळी गोव्यातील सुंदर ठिकाणी पार्टी करण्याचा आनंद घेत होतो.''