"ती माझ्या पाठीशी होती म्हणून हे घडलं...", नितीशने सांगितला यात्रेतील तो सीन शूट करतानाचा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 06:22 PM2024-07-09T18:22:20+5:302024-07-09T18:23:08+5:30

Lakhat Ek Aamcha Dada : 'लाखात एक आमचा दादा' या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केलाय.

"It happened because she was by my side...", recounts Nitish about the experience of shooting that Yatra scene. | "ती माझ्या पाठीशी होती म्हणून हे घडलं...", नितीशने सांगितला यात्रेतील तो सीन शूट करतानाचा अनुभव

"ती माझ्या पाठीशी होती म्हणून हे घडलं...", नितीशने सांगितला यात्रेतील तो सीन शूट करतानाचा अनुभव

झी मराठीवर नव्यानेच दाखल झालेल्या 'लाखात एक आमचा दादा' (Lakhat Ek Amcha Dada) या मालिकेचा पहिला भाग प्रसारित झाला आणि पहिला भाग पाहताच प्रेक्षकांनी मालिकेवर प्रेमाचा वर्षाव केला आणि सोशल मीडियावर दमदार प्रतिसाद यायला सुरुवात झाली. तो प्रतिसाद होता चार प्रेमळ बहिणींना, सूर्यादादाला आणि ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक जे या मालिकेत डॅडीची भूमिका साकारत आहेत. तसेच हा प्रतिसाद होता प्रत्येक दमदार व्यक्तिरेखेसाठी. जो क्षण आणि जो सीन प्रेक्षकांच्या हृदयात आणि मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात नेहमीसाठी कोरला गेला तो म्हणजे सूर्यादादाचा यात्रेमधला यात्रेचा सीन. 

नितीश चव्हाण म्हणाला की, जेव्हा मला कळलं की यात्रेमधला असा एक सीन करायचा आहे तेव्हा पासून मनात धाकधूक चालू होती. कसा होईल, काय करता येईल हे विचार सतत डोक्यात चालू होते. जेव्हा तो दिवस आला तेव्हा पर्यंत मी काहीही ठरवलं नव्हतं कारण अंगात येणं हे मी आज पर्यंत कधी अनुभवलं नव्हतं म्हणून ते कसं करायचं आणि काय करायचं ह्याची कल्पना नव्हती. जेव्हा मी तयार होऊन बसलो आणि तयार होऊन जेव्हा स्वतःला पहिल्यांदा आरश्यात पाहिलं ते पाहून माझा आत्मविश्वास वाढला. इतका कमाल लूक अस्तित्वात आणला होता. 

''मी पहिला टेक केला आणि...''

तो लूक पाहून ती भावना जागरूक झाली की मी काहीतरी वेगळं करायला चाललो आहे, यासाठी मला मेकअप दादांचे खूप खूप आभार मानायचे आहेत. सीनसाठी मी तयार झालो आणि सर्वात आधी देवी समोर गेलो तिचा आशीर्वाद घेतला आणि तिला प्रार्थना केली की मला माहिती नाही कसं करायचं, काय करायचं, तू माझ्या कडून हे सर्व नीट करून घे. मी पहिला टेक केला आणि तो संपल्यानंतर सर्वानी टाळ्यांचा गजर केला. सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्या की वाटलंच नाही तू नितीश आहेस आणि तू अभिनय करतोयस, असं वाटत होतं की खरंच तुझ्या अंगात आलाय. श्वेता मॅडमने  येऊन मिठी मारली, किरण सर आमचे दिग्दर्शक आले आणि म्हणाले बस तू फक्त एपिसोड बघ आता, असे नितीशने सांगितले.

तो पुढे म्हणाला की, सीन पूर्ण झाल्यावर परत एकदा देवीच्या चरणी गेलो आणि तिचे आभार मानले की माझ्याकडून हे तूच करवून  घेतलं आहेस. आमचं त्या दिवशीच शूटिंग संपल्यावर ही परत मी परत देवीला भेटायला गेलो आणि ती माझ्या पाठीशी उभी राहिली ह्याचे आभार मानले कारण हे फक्त तिच्यामुळेच मी करू शकलो. देवीच्या पालखीबद्दल बोलायचं झालं तर २० किलोची पालखी होती आणि आर्ट दादांनी तर कमालच केली होती. २० किलोची पालखी आणि तो पेहराव त्यासोबत डायलॉग्स बोलायचे हे सगळं करण्यात दमछाक होतं  होती, एकदा, दोनदा मला चक्कर ही आली पण तरी ही मी थांबलो नाही कारण ती एक ऊर्जा आणि  शक्ती अंगात होती. ही  सगळी ऊर्जा देवींनीच दिली असं मी मानतो आणि ती पाठीशी होती म्हणून यशस्वीपणे मी हा सीन निभावू शकलो ज्याचा इतका उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

Web Title: "It happened because she was by my side...", recounts Nitish about the experience of shooting that Yatra scene.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.