यह उन दिनों की बात है फेम आशी सिंहचा करण्यात आला मेकओव्हर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2018 10:32 AM2018-06-18T10:32:47+5:302018-06-18T16:02:47+5:30
यह उन दिनों की बात है या मालिकेने नुकताच लीप घेतला असून या मालिकेतील नायक समीर आणि नायिका नैनाच्या ...
य उन दिनों की बात है या मालिकेने नुकताच लीप घेतला असून या मालिकेतील नायक समीर आणि नायिका नैनाच्या कॉलेज आयुष्यातील घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
कॉलेजचे दिवस हा असा काळ असतो, जेव्हा तरुण मुले स्वतःमध्ये गुंग असतात आणि फॅशनेबल दिसण्याचा प्रयत्न करतात. असा काळ, जेव्हा तरुण मुले त्याच्या आवडत्या बॉलिवूड नायकाची नक्कल करतात आणि तरुण मुली मेकअप करणे, भुवया कोरणे, वॅक्सिंग वगैरे यांसारख्या गोष्टी पहिल्यांदाच करून पाहातात. सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘यह उन दिनों की बात है’ मालिकेत नैनाची भूमिका करणार्या आशीला आजवर सुंदर दिसण्यासाठी भुवया कोराव्यात असे कधी वाटले नव्हते. तिचा लुक अगदी साधा होता. ती मालिकेत किशोरवयीन मुलीची भूमिका साकारते. त्यामुळे तिचा लूक देखील तसाच ठेवण्यात आला होता. 90च्या दशकातील शालेय जीवनाच्या अनुभवाचा पुनःप्रत्यय प्रेक्षकांना दिल्यानंतर आता मालिकेचे निर्माते समीर (रणदीप राय) आणि नैनाच्या कॉलेज रोमान्सने प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
आशी सिंहने आजवर कधीच आपल्या भुवया कोरल्या नव्हत्या. तिला तिच्या कॉलेज लुकसाठी त्या कोराव्या लागल्या. सौंदर्य प्रसाधनांच्या बाबतीत अनभिज्ञ असलेल्या आशीने आपल्या साथीदारांकडून आणि जवळच्या मित्रांकडून त्याबाबत सल्ला घेतला. याबाबत आशी सिंहला विचारले असता ती सांगते, “नैनाची प्रतिमा एका अभ्यासू आणि आदर्श मुलीची आहे. ती सर्व परीक्षांमध्ये सर्वोत्तम गुण मिळवते. आता नैना कॉलेजात दाखल झाली आहे. त्यामुळे निर्मात्यांनी तिच्या व्यक्तिमत्वात आणि दिसण्यात देखील बदल केला आहे. मी आजवर सौंदर्य प्रसाधनांच्या मदतीने मेकअप कधीच केला नव्हता आणि जेव्हा क्रिएटिव्ह टीमने मला सुचवले की, मला माझ्या भुवया कोराव्या लागतील, तेव्हा मी पेचात पडले. मी त्या लूकमध्ये कशी दिसेन असा मला प्रश्न पडला होता. पण मी माझ्या आईचा आणि सेटवरील मित्रांचा सल्ला घेतला आणि त्यांनी मला भुवया कोरण्यास प्रोत्साहन दिले. सुरुवातीला मी थोडी घाबरले होते. पण माझ्या मैत्रिणींशी बोलल्यानंतर माझी भीती निघून गेली. एक कलाकार म्हणून मी साकारत असलेल्या भूमिकेला न्याय देणे हे माझे कर्तव्यच आहे असे मला वाटत असल्याने मी माझ्या लूकमध्ये बदल केला.”
Also Read : यह उन दिनों की बात है फेम रणदीप रायवर का आली रिक्षा चालवण्याची वेळ