यह उन दिनों की बात है या मालिकेतील रणदीप राय करणार अजय देवगणसारखा स्टंट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2018 05:59 AM2018-04-06T05:59:22+5:302018-04-06T11:29:22+5:30
सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर यह उन दिनों की बात है ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील ...
स नी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनवर यह उन दिनों की बात है ही मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ही मालिका सगळ्याच वयोगटातील प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. 90 च्या दशकातील ही कथा असून या मालिकेत प्रेक्षकांना तो काळ पाहायला मिळत आहे. या मालिकेतील समीर म्हणजेच रणदीप राय आणि नैना म्हणजेच आशी सिंह यांची प्रेमकथा दाखवली जात आहे. या मालिकेतील समीर आणि नैना यांची प्रेमकथा प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
यह उन दिनों की बात है या मालिकेत समीर ही भूमिका साकारणार्या समीर महेश्वरीचे चाहते त्याची तुलना 90च्या दशकातील प्रेक्षकांचे लाडके हिरो शाहरुख आणि सलमान यांच्याशी सध्या करत आहेत आणि आता तर रणदीप एक भयंकर मोटरसायकल स्टंट करून 90 च्या दशकातील आणखी एका सुपरस्टारची नक्कल करणार आहे. फूल और कांटे चित्रपटात अजय देवगणने केला होता तसा दोन चालत्या मोटर सायकलींवर एकाच वेळी पाय देऊन केलेला स्टंट रणदीप टेलिव्हिजनवर करून आपल्या प्रेक्षकांना विस्मयचकित करून सोडणार आहे. .याविषयी रणदीप रायला विचारले असता त्याने पुष्टी केली. तो सांगतो, “’यह उन दिनों की बात है या मालिकेतील माझी एंट्री अगदी वेगळी होती, त्या दृश्यात मी दोन मोटर सायकलींद्वारा खेचल्या जाणार्या रोलर स्केटरवर दिसलो होतो. मालिकेच्या क्रिएटिव्ह टीमने पुन्हा एकदा दोन मोटर सायकली घेऊन एक स्टंट करण्याचे ठरवले आहे. सुरूवातीला मी थोडा घाबरलो होतो कारण दोन मोटर सायकलींवर स्वतःचे संतुलन ठेवून उभे राहणे काही सोपे काम नाही. दोन्ही गाड्यांच्या चालकांनी अगदी एकाच गतीने गाडी चालवणे गरजेचे आहे. अन्यथा मी जोरात पडू शकतो. हा स्टंट करण्याचा अनुभव रोमांचक होता आणि असा स्टंट केल्यानंतर अजय सरांना कसे वाटले असेल याची कल्पना मी करू शकतो. हे खरोखरच मोठे आव्हान होते!”
या मालिकेच्या आगामी कथानकात समीर दिल्लीला गेलेला आहे आणि तो नैनाशी पत्राद्वारे आणि अधून मधून फोन करून संपर्कात आहे. दिल्लीच्या वास्तव्यात समीर वाईट लोकांच्या संगतीत राहत असून त्यांच्या सोबतच खूप वेळ घालवत आहे. दुसरीकडे, परीक्षेत नापास झालेली नैना अभ्यासात बुडून गेली आहे.
Also Read : यह उन दिनो की बात है या मालिकेत झळकणार सुमित मित्तल