"असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...", अश्विनी महांगडेनं वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेअर केली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2024 10:47 IST2024-05-18T10:46:56+5:302024-05-18T10:47:27+5:30
Ashwini Mahangade : अश्विनी महांगडे हिने तिच्या वडिलांच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असा बापमाणूस मिळण्यासाठी भाग्य लागते असे म्हटले आहे. तसेच तिने त्यांनी त्यांच्यासाठी पाहिलेली स्वप्नंदेखील पूर्ण करणार म्हटले आहे.

"असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...", अश्विनी महांगडेनं वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शेअर केली पोस्ट
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिकेतील अनघाच्या भूमिकेतून अभिनेत्री अश्विनी महांगडे (Ashwini Mahangade) घराघरात पोहचली. तिला या भूमिकेतून प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. अश्विनीचा सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे. तीदेखील या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान आता तिने तिच्या वडिलांच्या पुण्यस्मरणा दिनानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात तिने असा बापमाणूस मिळण्यासाठी भाग्य लागते असे म्हटले आहे. तसेच तिने त्यांनी त्यांच्यासाठी पाहिलेली स्वप्नंदेखील पूर्ण करणार म्हटले आहे.
अश्विनी महांगडे हिने इंस्टाग्रामवर वडिलांचा फोटो शेअर करत लिहिले की, आज नानांचा तिसरा पुण्यस्मरणदीन..बघता बघता ३ वर्ष निघून गेली त्यांच्याशिवाय. बरेच आनंदाचे क्षण, दुःख, घेतलेल्या वस्तू, माझे पहिले घर हा सगळा त्यांच्याशिवाय करावा लागलेला प्रवास. पण या सगळ्यात माझ्या विचारात, माझ्यात ते कायम आहेत आणि राहतील.
असा बापमाणूस मिळायला भाग्य लागतं. त्यांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांनी आमच्यासाठी पाहिलेली स्वप्न मला सांगितली आणि ती मी नक्की पूर्ण करेन. लव्ह यू नाना.
वर्कफ्रंट...
अश्विनी महांगडेच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात काम केले आहे. तिने ‘आधी बसू मग बोलू’, ‘गोलपिठा’सारख्या नाटकात काम केले आहे. ‘अस्मिता’ या मालिकेत ‘मनाली’ची भूमिका तिने केली. या मालिकेने तिला खरी ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत राणूअक्काची भूमिका केली. या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. सध्या ती आई कुठे काय करते मालिकेत काम करताना दिसते आहे. याशिवाय तिने बॉईज, टपाल, महाराष्ट्र शाहीर या चित्रपटात काम केले आहे. तसेच ती धर्मरक्षक अहिल्याबाई होळकर या चित्रपटात झळकणार आहे.