'इतका खळबळजनक किंवा चर्चा करण्यासारखा विषय नव्हता...', अखेर मधुराणी प्रभुलकरनं सोडलं मौन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:38 PM2023-07-26T17:38:29+5:302023-07-26T17:40:50+5:30
Madhurani Prabhulkar : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मधुराणी प्रभुलकर चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकरसोबत सुरु केलेल्या मिरॅकल्स डान्स संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत आईची म्हणजेच अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिने साकारली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मधुराणी चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी मधुराणीने तिचा नवरा प्रमोद प्रभुलकरसोबत सुरु केलेल्या मिरॅकल्स डान्स संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर तिच्या घटस्फोटाची बातमी समोर आली होती. मात्र तिचा नवरा प्रमोद प्रभुलकरने हे वृत्त फेटाळून लावले. दरम्यान आता मधुराणीने एका मुलाखतीत संस्थेच्या संचालकपदाचा राजीनामा का दिला, याबद्दल सांगितले.
मधुराधी प्रभुलकर म्हणाली की, एवढं खळबळजनक किंवा चर्चा करण्यासारखा विषय नव्हता. अनेक वर्षांपूर्वी तिने आणि प्रमोदने मिरॅकल अकॅडमी सुरू केली. परंतु नंतर माझ्या लक्षात आले की त्या अकॅडमीसाठी मला वेळच मिळत नव्हता. कारण अकॅडमी हा माझ्या अवाक्याचा भाग नाही आणि ते स्वप्नही माझे कधीच नव्हते. ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सुरु झाल्यानंतर मी खुपच व्यस्त झाली आणि मालिकेच्या बिझी शेड्युलमुळे अकॅडमीची शाखा कुठे आणि त्यात काय शिजते आहे हे माहित नव्हते. मालिकेच्या शूटिंगमधुन वेळ मिळाला की तो वेळ मी मुलीसोबत व्यतित करते. त्यामुळे तिने शांतपणे विचार करुन निर्णय घेतला.
संचालिकापद मिरवण्यात अर्थच उरला नाही....
ती पुढे म्हणाली की, त्या अकॅडमीसाठी तिला वेळच काढता येत नव्हता. त्यामुळे संचालिकापद मिरवण्यात अर्थच उरला नाही. म्हणून तिने तिचा नवरा प्रमोदलाच या अकॅडमीची संपूर्ण जबाबदारी सोपवली. या अॅकेडमीने खूप चांगले कलाकार घडवले आहेत. प्रमोद खूप चांगले काम करत आहे. मी ज्यावेळी त्यात सक्रीय होते तेव्हा खरोखर मी सक्रीय होते, पण आता मला वेळ देताच येत नाही आहे. त्यामुळे मला असे वाटले की वेगळे झालेले बरे. मिरॅकल्स अॅकॅडमीतून बाहेर पडण्याचे कारण सांगत मधुराणीने इतर चर्चांना पूर्णविराम लावला आहे.