कुणी काम देतं का काम.. असं म्हणण्याची वेळ आलीय 'शक्तिमान' मालिकेतील या अभिनेत्यावर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 02:18 PM2023-04-18T14:18:10+5:302023-04-18T14:18:43+5:30

शक्तिमान मालिकेतील अभिनेता सध्या आर्थिक संकटात सापडला आहे.

It's time to say who works, why works.. on this actor from the 'Shaktiman' series | कुणी काम देतं का काम.. असं म्हणण्याची वेळ आलीय 'शक्तिमान' मालिकेतील या अभिनेत्यावर

कुणी काम देतं का काम.. असं म्हणण्याची वेळ आलीय 'शक्तिमान' मालिकेतील या अभिनेत्यावर

googlenewsNext

हिंदी मालिकेत कमी उंचीचा अभिनेता केके गोस्वामीने अनेक छोट्या मोठ्या भूमिकेतून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. केके गोस्वामी अनेक टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. काही दिवसांपूर्वी कार अपघातामुळेही तो चर्चेत आला होता. पण आता अभिनेत्याने खुलासा केला आहे की त्याच्याकडे बरेच दिवस काम नाही आणि तो आर्थिक संकटातून जात आहे. काही दिवसांपूर्वी काम मागण्यासाठी तो एकता कपूरला भेटायलाही गेला होता.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत केके गोस्वामी म्हणाले- 'अनेक आयकॉनिक शो करूनही आज मला चांगले काम मिळत नाही याचा मला जास्त त्रास होतो. मी कधीच विचार केला नाही की अशी वेळ येईल जेव्हा माझ्याकडे शोच नसतील. सध्या मी एका चांगल्या शोची वाट पाहत आहे.


यासोबतच केके गोस्वामी म्हणाले की, 'कामानिमित्त काही दिवसांपूर्वी मी एकता कपूरला भेटायलाही गेलो होतो. मी तिला भेटून काम मागितले. केके गोस्वामी पुढे म्हणाले की त्यांच्याकडे काही प्रकल्प आहेत ज्यात ते काम करत आहेत परंतु हे सर्व उदरनिर्वाहासाठी आहेत.


केके गोस्वामी हे ९० च्या दशकात मोठे नाव होते. लहान मुले त्याला ओळखायची. 'शक्तिमान', 'शका लाका बूम बूम' आणि 'शश्श' सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. शेवटचा हिट शो २०१३ मधील 'गुटर गू' होती. यानंतर तो अनेक छोट्या भूमिकांमध्ये दिसला. केके काही काळापूर्वी कार अपघाताचा बळी ठरला होता. ही कार केकेचा २१ वर्षांचा मुलगा चालवत होता. या अपघातात दोघेही बचावले असले तरी कारचे मोठे नुकसान झाले होते.

Web Title: It's time to say who works, why works.. on this actor from the 'Shaktiman' series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.